अनामिका..आज स्वतःला संपवायचे या विचारानेच घराबाहेर पडली होती. नुकतंच शिक्षण पूर्ण झालेली, दिसायला देखणी, लाघवी, हुशार, काहीतरी वेगळं करून दाखवेल असे सर्वांना जीच्याबद्दल वाटायचे अशी नेहा आणि आशिष यांची एकुलती एक लेक म्हणजे अनामिका. महिनाभरा पूर्वी प्रेमभंग झाला होता तिचा. ते सहन होते नव्हते तीच्याने. म्हणून आज स्वतः संपवायला निघाली होती.वाटेत तिची नजर एका अपंग मुलाकडे गेली.हात नसूनही पायाच्या मदतीने खुप सुरेख चित्र काढत होता तो. त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान होते. आयुष्य जगण्यासाठी त्याची चाललेली धडपड पाहून तिची कायापालट झाली.आत्महत्येच्या विचारांची तिला लाज वाटली.स्वतः शी काहीतरी ठरवून हसतमुखाने ती घराकडे वळली.
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.


