Home » Marathi » Technology » गूगल सर्च वापरायच्या सर्वोत्तम १० टिप्स आणि ट्रिक्स

गूगल सर्च वापरायच्या सर्वोत्तम १० टिप्स आणि ट्रिक्स

सध्या स्मार्टफोनच्या युगात आपण विविध कारणांसाठी गूगल सर्चचा वापर करतो. इंटरनेट वरून काही माहिती, पत्ता , फोटो, विडिओ, गाणी अस बरंच काही आपण गूगलच्या साहाय्याने खूप सहज रित्या शोधू शकतो. किंतु आपल्या पैकी बरेच जण गूगल सर्चचा वापर पूर्णपणे कार्यक्षम पद्धतीने करत नसावेत. गूगल  सर्च वापरण्याच्या खालील काही युक्त्या आपले दैनंदिन जीवन अजून सोयीस्कर बनवू शकते.

१. गूगल टॅब्सचा यौग्य वापर –
गूगल  सर्च केल्यावर विविध प्रकारचे टॅब्स  आपल्याला स्क्रीनच्या वरच्या बाजूस दिसतात. हे वापरून आपण, आपल्याला हवी असलेली अचूक माहिती शोधू शकतो.
उदाहरणार्थ – आपण गूगल  वर Marathi Movies सर्च केले  तर आपल्याला विविध टॅब्स दिसतात, त्यावर क्लिक करून आपण आपल्या हवी असलेली माहिती शोधू शकतो.  (Videos, Images, News, Drama, Comedy etc.)

google tabs

२. दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर –
गूगल  सर्च करताना जेव्हा आपण एखाद वाक्य दुहेरी अवतरण (“Double quotes”) चिन्हा मध्ये टाकतो तेव्हा गूगल  ते पूर्ण वाक्य असलेली माहिती पुरवतो.

उदाहरणार्थ – जर आपण सर्च करताना महाराष्ट्रातील जिल्हे किती व कोणते असे लिहिले, तर गूगल आपल्याला असे सर्व pages दाखवेल ज्यामध्ये आपण सर्च केलेल्या शब्दांपैकी एखादा तरी शब्द असेल.

किंतु जर आपण सर्च करताना “महाराष्ट्रातील जिल्हे किती व कोणते”, अशा प्रकारे दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला तर गूगल result तेवढेच pages दाखवेल ज्यामध्ये वरील सर्व शब्द समाविष्ट असतील.

३. एखादा शब्द कसा वगळावा –
गूगल result मधून एखादा शब्द किंवा प्रकार वगळायचा असल्यास आपण डॅश (-) चा वापर करावा.
उदाहरणार्थ – आपल्याला सफारी कार बद्दल माहिती शोधायची आहे. जेव्हा आपण गूगल मध्ये safari म्हणून सर्च करतो. गूगल आपल्याला safari web browser असा result दाखवतो.

खाली दिलेल्या फोटो प्रमाणे सर्च बार मध्ये डॅश (-) चा वापर केल्यास गूगल result मधून browser वगळतो आणि सफारी कार ची माहिती देतो.

४. विशिष्ट वेबसाईटवर सर्च कसे करावे –
बरेचदा आपल्याला एखाद्या ठराविक वेबसाईटवर माहिती शोधायची असते, परंतु गूगल result मध्ये अनेक गरज नसलेल्या लिंक्स आपल्याला बघायला मिळतात, त्याकरिता आपण सर्च करत असेलेले वाक्य : वेबसाईटचे नाव असे सर्च करावे.
उदाहरणार्थ – कोलनचा वापर न करता जेव्हा आपण सर्च करतो तेव्हा result खालीलप्रमाणे असतो.

कोलनचा वापर करून जेव्हा आपण वेबसाईटचे नाव टाकतो, तेव्हा result हा फक्त त्याच वेबसाईट वरील माहिती पुरवतो.

५. स्टार चिन्हाचा वापर (*) –
समजा आपल्याला एखादा गाणं , कविता किंवा अशी काही माहिती सर्च करायची आहे ज्याचा पूर्ण वाक्य आपल्याला माहित नाही किंवा आठवत नाही त्यावेळेस * ह्या चिन्हाचा वापर फारच फायदेशीर ठरतो.
उदाहरणार्थ – आपलायला “मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा” असे काही सर्च करायचे आहे, पण पूर्ण वाक्य माहित नाही आहे. त्या वेळेस खालील प्रमाणे * चिन्हाचा वापर करावा.

६. गूगल Calculator –
गूगलचा वापर आपण एक Calculator म्हणून हिशेब करण्यासाठी देखील करू शकतो. खाली दिल्याप्रमाणे एखादे समीकरण सर्च बारमध्ये टाकल्यास आपल्याला त्याचे उत्तर मिळते.

७. गूगल सर्चचा वापर दैनंदिन जीवनात कसा करावा –
गूगल सर्च इंजिन User चे लोकेशन चेक करून ठराविक माहिती पुरवते.
उदाहरणार्थ – आपल्या घरा जवळील रेस्टॉरंट , पेट्रोल पंप, सिनेमा गृह , सर्व्हिस सेंटर इत्यादी काही माहिती हवी असल्यास खालील प्रमाणे सर्च करावे.

८. गूगल शॉर्टकट्स –
गूगल  शॉर्टकट्सचा वापर करून आपण हवी असलेली माहिती पटकन मिळवू शकतो.
उदाहरणार्थ – आपणास एखाद्या ठिकाणचे तापमान किती आहे हे माहित करायचे असल्यास “त्या जागेचे नाव weather ” असे सर्च करावे.

एखाद्या ठिकाणची वेळ माहित कराची असल्यास, “त्या जागेचे नाव time” असे सर्च करावे.

एखाद्या शेअरची किंमत माहित करायची असल्यास “त्या शेअर चा नाव price” असे सर्च करावे.

९. स्पेलिंग महत्वाचे नाही –
गूगल सर्च करताना स्पेलिंग बरोबर असणे महत्वाचे नाही. गूगल हे एक खूप स्मार्ट सर्च इंजिन आहे, त्यामुळे आपण चुकीची स्पेलिंग टाकली तरी देखील ते बरोबर result दाखवत.
उदाहरणार्थ – गूगल सर्च बार मध्ये “satin chendoolkar” सर्च केल्यावर आपल्याला खाली दिल्या प्रमाणे गूगल ऑटो करेक्ट feature द्वारा योग्य तो result मीळतो.

१०. फाईल सर्च –
बऱ्याच वेळेला आपल्याला काही ठरावीक फाईल फॉरमॅट्स गूगल वर सर्च करायचे असतात त्या वेळेला आपल्याला ह्या feature चा उपयोग होऊ शकतो.
उदाहरणार्थ – आपण सर्च करत असलेल्या फाईलचे एक्स्टेंशन माहित असणे गरजेचे आहे. .pdf, .xlsx, .mp3… इत्यादी. सर्च करताना “आपण सर्च करत असलेले वाक्य filetype:एक्स्टेंशन” अशा प्रकारे सर्च करावे.
खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आपण मनाचे श्लोक pdf format मध्ये शोधून डाउनलोड करू शकतो.

तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटल्यास कृपया आपली प्रतिक्रिया कंमेंट्स सेक्शन मध्ये कळवावी.

Alpesh Naik

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *