आयुष्यातले छोटे हसरे क्षण..
राघव जे असेल ते पटकन बोलणारा,तर जुई थोडीशी हळवी,मनातलं लगेच न सांगणारी.असेच एके दिवशी राघवचे ऑफिसमध्ये काहीतरी बिनसले.त्याच रागात तो घरी आला.जुईसुध्दा थोडी वैतागलेली होती.आधी ऑफिस,मग घरची कामं,मुलाचा पसारा,त्यातच सासूबाईंनी तिला जेवणावरून सुनावले होते.राघवने जुईला खुप वेळा विचारून सुध्दा ती काहीच सांगत नव्हती.शेवटी राघव वैतागला आणि तिच्यावर चिडला.जुई रडू लागली.ते पाहून तर त्याला अजून राग…