Stories

हवी हवीशी अवजड बेडी – सासुरवास.

अखेर जुईने अभिषेकच्या लग्नाचा मुहूर्त निघाला. जुई आणि अभिषेक गेले चार वर्ष एकमेकांच्या प्रेमात होते. एका मैत्रिणीच्या बर्थ डे पार्टी ला दोघांची भेट झाली. पहिल्या भेटीतच अभिषेक तिच्यावर फिदा झाला. मग हळूहळू या ना त्या कारणाने तो मैत्रिणीच्या मदतीने जुईला भेटू लागला. तिला इंप्रेस करण्यासाठी वेग वेगळ्या युक्ती करू लागल्या. जुईला सुध्दा अभिषेकच वागणं कळत…

Informative

दम लागत असल्यास काय करावे?

कोरोनाची सौम्या लक्षणे, कोरोनातून बरे झाल्यानंतर तसेच श्वसन संस्था , हृदय या संबंधी आजार असल्यास बरेचदा दैनंदिन जीवनातील छोटीमोठी कामे करतानाही दम लागण्याच्या समस्येला काही जणांना सामोरे जावे लागते.अशी समस्या उद्भवल्यास पुढील गोष्टी कराव्यात.. १ – खुर्ची अथवा सोफ्यावर बसून थोडे पुढे झुकावे. हात मांडीवर ठेवावे. २ – खुर्ची , टेबल असल्यास खुर्चीवर बसून टेबलावर…

Informative

६ मिनिट्स वॉक टेस्ट.

नजीकच्या काळात रक्तातील ऑक्सिजन पातळी ( blood oxygen saturation level) , पल्स ऑक्सिमीटर असे काही शब्द आपण ऐकले आहे. कोरोना मुळे आता ऑक्सिजन पातळी सतत तपासत राहणं खुप गरजेचं आहे हे असा सल्ला हल्ली सर्वच डॉक्टराकडून मिळतो.६ मिनिट्स वॉक टेस्ट ही एक अशीच टेस्ट आहे जी केल्याने आपल्याला आपल्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची योग्य माहिती मिळते….

Stories

वादळ – एक अनपेक्षित वळण.

सौम्या नोकरी निम्मित पहिल्यांदाच मुंबईत आली होती. या आधी मुंबईत येण्याचा प्रश्नच नव्हता. सार काही गावाकडे.. सगळे नातेवाईक गावाकडे.. शिक्षण सुध्दा तालुक्यात झालं. पाटलांची एकुलती एक लेक.. त्यातच तीन पिढ्यामध्ये पहिली मुलगी. त्यामुळे लाडाकोडात वाढलेली. जे जे मागेल ते तिला मिळालं. घरात एवढं शिकलेली ती पहिलीच. स्वतःच्या पायावर उभं राहायचं, स्वतःची ओळख निर्माण करायची यासाठी…

100 Words Stories

कोणे एके काळी..

वाघाची गोष्ट वाघ,वाघीण आणि तीन बछड्यांसोबत चुकून मानवी वस्तीत शिरला.एकच गोंधळ माजला.लोकांनी त्यांच्यावर मिळेल त्याने वार करायला सुरुवात केली.वाघीण जखमी झाली.ते पाचही जण कसेबसे वस्तीतून बाहेर पडले.वाघिणीला रक्तबंबाळ झालेले पाहून बछडे रडू लागले. रडत वाघाला म्हणाले, ” बाबा माणूस कसा कुटुंबासाठी घर बांधतो.तुम्ही आमच्यासाठी घर का नाही बांधलं?आज आपलं घर असतं तर आपण भटकलो नसतो.आईला…

Informative

प्रसूती पूर्व आणि प्रसूती नंतरच्या प्रवासात फिजिओथेरपीची भूमिका.

Pregnancy म्हणजे प्रसूती पूर्व काळ.. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला सुंदर काळ. इवल्या इवल्या पावलांची लागलेली पहिली चाहूल कुठलीच आई उभ्या आयुष्यात विसरू शकत नाही. तिच्या पोटात वाढणारा तो गर्भ म्हणजे जणू तिचं सर्वस्वच होऊन जातो. त्याच्या आगमनाची ती अगदी आतुरतेने वाट पाहत असते. त्याच्या संगोपनासाठी स्वतः ला तयार करत असते. पण खरंच तिची तयारी कधी पूर्ण…

Blogs

My little monster..

प्रेग्नंसी टेस्ट किटवरच्या त्या दोन गुलाबी रंगाच्या रेषांनी माझे आयुष्यच बदलून गेले. तो दिवस आजही आठवला की हसू येत. त्या दिवशी सुध्दा जेव्हा त्या दोन रेषा मी पहिल्यांदा पाहिल्या होत्या तेव्हा सुध्दा बराच वेळ हसतच बसले होते. लग्नाला तीनच महिने उलटले होते आमच्या आणि आम्ही ठरवलं की आपण बेबी प्लॅन करू. करिअर प्लॅनिंग, फायनान्स प्लॅनिंग,…

Quotes

सप्तरंग प्रेमाचे

सप्तरंगप्रेमाचे – निवारा खरतर कमतरता अशी कशाचीच नव्हती,पण तुझ्या येण्याने विलक्षण असे काही तरी मिळाल्याचा आनंद झाला होता.आयुष्याच्या प्रत्येक वादळात मला जपून ठेवणारा माझा हक्काचा निवारा मला सापडला होता. सप्तरंगप्रेमाचे – साक्ष विश्वासाच्या धाग्यात मैत्रीचे मोती गुंफले , प्रेमाच्या रेशीम गाठीत हे नाते खुलले. सप्तपदी चालून तुझी अर्धांगिनी झाले , तुझ्या माझ्या प्रेमाची साक्ष द्यायला…

100 Words Stories

प्रजासत्ताक दिन.

१५ ऑगस्ट १९४७ साली आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण २६ जानेवारी १९५० साली संविधान स्वीकारून भारत देश एक लोकतांत्रिक, सार्वभौमिक आणि गणराज्य देश बनला. प्रजासत्ताक म्हणजेच प्रजेची सत्ता असलेला हा भारत देश.. “हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची, रामायणे घडावी,येथे पराक्रमाची शीर उंच उंच व्हावे, हिमवंत…