मैत्री.. आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या रूपात भेटते. हे एक असे नाते जे जात – पात,धर्म, वय, नाती गोती, लिंग, भाषा सर्वांच्याशी पलिकडेचे तरी सर्वात जवळचे.
काही सवंगडी येतात आपल्या आयुष्यात आणि त्यांचा कार्य भाग संपला की निघूनही जातात.पण काही असतात खूप खास.. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सोबत देतात. आपल्या चुकांसाठी समजावतात,ओरडतात वेळप्रसंगी कान पिळतात, अगदी शिव्या देतात. पण जगासमोर नेहमी आपली बाजू घेतात. धडपडल्यावर सावरतात. कधी आपल्यासोबत धडपडतात. आपल्याला आपल्या गुण दोषा सोबत स्वीकारतात. सुखाच्या समयी तर असतातच पण दुःखाच्या वेळी भक्कम आधार देतात.
अशा मैत्रीला नसते गरज रोज संवाद साधण्याची,रोज भेटण्याची,कुठलाही दिखावा करण्याची.काळजी,आपुलकी, आदर ,माया ही आहे ओळख निस्वार्थ मैत्रीची.एवढं असूनही या मैत्रीला गरज नसते कुठल्याच औपचारिक बंधनाची.
फोटो साभार – unsplash.com
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.