Home » Marathi » 100 Words Stories » माझी माय.

माझी माय.

लेकीचा अपघात झाल्याचे कळताच नर्मदाबाई धावतच तिच्या सासरी गेल्या. इंजुरी सिरीयस होती. नर्मदबाईंनी अगदी सहा महिने तिथे राहून लेकीच सर्व केले. तिला बरे करताना तिचे घरही सांभाळले. ती थोडी स्थिरस्थावर झाल्यावर त्या निघाल्या.

लेकीने त्यांचे पाय पकडले,ओक्साबोक्शी रडत म्हणाली,“आई मला माफ कर.सावत्र म्हणून मी नेहमीच तुझा अनादर केला.पण तू नेहमीच माया दिली.तुझा चांगुलपणा मला कधीच दिसला नाही.मी तुला गृहीतच धरले.मला हवी ती शिक्षा दे.

नर्मदाबाई भरल्या डोळ्यांनी उसासा घेत म्हणाल्या,” बाळा आज पहिल्यांदा मला आई म्हणालीस अजून काय हवं असतं ग आईला.सावत्र सख्खी अशी नसतेच आई.मी फक्त आई म्हणून माझं कर्तव्य केलं.आई कधी आपल्या बाळाला शिक्षा देऊ शकते का!”


जन्मदात्री नसूनही माया लावणाऱ्या ह्या आईला शतशः प्रणाम.

डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *