‘तिचा मुलगा बघ सर्व खातो, तिची मुलगी बघ किती ॲक्टिव आहे, जरा शिक तिच्याकडून बाळाला कस सांभाळायचं ते..’ अशा अनेक गोष्टी प्रत्येक आईला कमी अधिक प्रमाणात ऐकाव्या लागतात. त्यामुळे बरेचदा नव्याने आई झालेल्या तिच्यात न्यूनगंड निर्माण होतो. ‘मला हे आईपण पेलवेल ना? बाळाला माझ्यामुळे काही इजा तर होणार नाही ना?’ असे प्रश्न तिला पडतात.
आईचा जन्मसुध्दा त्या बाळासोबतच होतो,त्या आधी ती फक्त एक स्वच्छंदी स्त्री असते हे कित्येकदा तिच्या चुका शोधणारे विसरून जातात.बाळासोबत ती सुध्दा नव्याने सर्व शिकत असते,अनुभवत असते. खरंतर आईच तिच्या बाळाला नीट समजू शकते.तिच्या बाळासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे ती पारखु शकते, हे मी माझ्या अनुभवातून शिकले.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.