Home » Marathi » Blogs » एक संधी…

एक संधी…

Ek Sandhi

मनुष्य प्राणी…. पृथ्वीतलावर अस्तित्वात असणाऱ्या सर्व सजीव जीवांमधला हुशार प्राणी. खरतर अतिहुशार प्राणी. किती अजब आहोत ना आपण.. किती बदल घडले आपल्यात, अगदी अश्मयुगीन मानवापासून ते आताचे आपण… शोध तर इतके लावले की  आता असं वाटू लागलं आहे ,आपण मृत्यू वर ही विजय मिळवू शकतो . “अपुनहीच भगवान है ” असा काहीसा आपला समज झालेला दिसतो . पण खरच तस कधी होऊ शकत का???? प्रत्येक वेळेला उत्तर मिळत .. नाही …  

 Corona Virus ने जगभर थैमान घातल आहे . लाखोंच्या संख्येने  लोक या Virus ने पछाडले आहेत.  रोज शेकडो लोक मरण पावत आहेत . जे यात मरण पावतात त्यांची अंत्ययात्रा सुद्धा काढता येत नाही. ना त्यांना त्यांच्या कुटुंबाला शेवटचं बघता येत. हा Corona Virus काय आहे , त्यामुळे काय होत ,तो कुठून आला हे आता आपल्याला वेगळं अस सांगायची गरज नाही .कोणी म्हणत हे Bio Logical Weapon आहे,तर कोणी म्हणत चीन च्या खाद्य संस्कृती मुळे जगावर झालेला आघात . आता ह्या चीनी लोकांची खाद्य संस्कृती आपल्यासाठी नवीन नाही.  जर हे Bio Logical Weapon असेल तर , माणसानेच माणसाला संपवण्यासाठी रचलेला कट आहे, आणि हा जर चीन च्या खाद्य संस्कृती मुळे झालेला आघात असेल तर आपणच निसर्गाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा परिणाम आहे. सरते शेवटी दोषी कोण ??? माणूसच ना… बदल, आधुनिकता , शोध  ही काळाची गरज आहे . आपण बदललो म्हणून तरलो, नाहीतर मनुष्य प्राणी सुद्धा इतर काही जीवांसारखा नष्टच झाला असता . पण हे सर्व करताना आपण या निसर्गाचा भाग आहोत, हे विसरून चालणार नाही.  निसर्गाचाही मान राखण गरजेचं आहे .

Corona च्या उद्रेकामुळे माणसाचे बरेच चेहरे समोर आले . चीन मधून Viral झालेल्या एका विडिओ मध्ये एक कोरोना ग्रस्त महिला रात्री शेजारयांच्या दरवाज्याच्या कढ्यांवर थुंकताना दिसली. तर कुठे  काही कोरोनाग्रस्त लिफ्ट च्या  बटणांवर थुंकी लावताना दिसले . इराण मध्ये तर काही लोक कोरोना वैगरे काही नसून सरकार आपल्या धार्मिक मान्यतांवर घाला घालत असल्याच समजून जागोजागी गर्दी करून मोर्चे काढताना दिसले . स्पेन ,इटली ,जर्मनी सारख्या देशांनी तर काही काळ या गोष्टी हसण्यावारी घेतल्या. आणि आज या देशांची काय अवस्था आहे हे आपल्याला ठाऊक आहेच. ऑस्ट्रेलिया ,स्वित्झलँड सारख्या देशात चीनी आणि ईराणी सारख्या दिसणाऱ्या लोकांना तिथल्या स्थानिकांनी बेदम मार दिला. या सर्वात आपला भारत काही सुटला नाही. काही जण आम्हाला कोरोना होणारच नाही अशा आवेगात सगळीकडे हिंडताना दिसतात . २२ मार्च ला संध्याकाळी ५ नंतर लोकांनी काढलेले मोर्चे हे आपल्या बिनडोक पणाचाच लक्षण आहे. काही लोक तर कोरोना अस्तित्वातच नसल्याचा दावा करतात,तर काही हे सरकारच नवं कारस्थान असल्याच म्हणतात. आता देश पूर्णपणे संचारबंदी असूनही काही जण स्वैराचाराने वावरताना दिसतात . लोक मिळेल ते वाहन पकडून आपापल्या गावी जात आहेत. तर गावकऱ्यांनी मुंबई पुण्याहून येणाऱ्यांसाठी गावाच्या सीमा बंद केल्या आहेत. जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा केला जाईल असं जाहीर करूनही नको तेवढा साठा करण्यात काही जण व्यस्त आहेत . सॅनिटायझर, मास्क यांचा काळा बाजार सुरु आहे. भाजीपाला लोकांच्या मुर्खपणामुळे महाग विकला जातो आहे. भारत किती गरीब, घाणेरडा देश आहे ,हे जगाला ओरडून सांगणारे परदेशी स्थायिक झालेले भारतीय आता भारतात परतण्यासाठी रांगा लावून उभे आहेत. काही जण कॅनडा सरकारने त्या देशातील नागरिकांसाठी जाहीर केलेली निधी आणि आपल्या सरकारने आपल्यासाठी केलेल्या सोयी याची तुलना करण्यात मग्न आहेत. एकीकडे कोरोना आहेच तर दुसरी कडे निसर्गानेही आपल्याला सोडलेल नाही. जागोजागी या हंगामात होणारा मुसळधार पाऊस, मधेच जाणवणारे भूकंपाचे सौम्य धक्के हा निसर्गाचा आपल्यावरचा रोष नाहीतर दुसर काय आहे..  जे पोलीस आपल्या रक्षणा करीता घर-दार विसरून  उन्हा तान्हात सुद्धा आपल्यासाठी उभे आहेत त्यांनाही मारल्याच्या घटना समोर येत आहेत.  जे डॉक्टर्स पुरेश्या सेफटी किट्स नसतानाही रुग्णांना बरं करण्यात व्यस्त आहेत त्यांनाही काही ठिकाणी समाजाने वाळीत टाकल्याचे प्रसंग कानी पडत आहेत.                                                                                      

खरच इतक कठीण आहे का घरात बसण ??? खरच कठीण आहे का आपल्या स्वतःची आणि आपल्या प्रिय व्यक्तींची काळजी घेण??? खरच कठीण आहे का जिथे आपण राहतो त्या परिसराची काळजी घेण ??? खरतर प्रत्येकाने आत्म परीक्षण करण्याची हीच ती वेळ. आता सध्याच्या परिस्थितीत काय अस वेगळ करायच आहे आपल्याला. फक्त घरातच तर बसायच आहे.  एवढ सोप्प काम.. फक्त घरी बसून स्वतःच, स्वतःच्या प्रिय व्यक्तींच, समाजाच आणि निसर्गाच भल करण्याची संधी आपल्याला परत कधी मिळेल कोणास ठाऊक. ज्या घरासाठी आपण रात्रंदिवस झटतो त्या घरासोबत एवढा वेळ घालवण्याची संधी परत कधी मिळेल कोणास ठाऊक. जी आई आपल्या साठी दिवसभर राबते तिला थोढीशी मदत करून तिच्या चेहऱ्यावरच समाधान पाहण्याची संधी आपल्याला परत कधी मिळेल कोणास ठाऊक. बाबांसोबत जुने चित्रपट पाहण्याची, त्यांच्या सोबत बसून जुनी गाणी गुणगुणण्याची, जगभरात होणाऱ्या गोष्टींवर त्यांचं मनोगत ऐकण्याची संधी परत कधी मिळेल कोणास ठाऊक. जोडीदारासोबत निवांत बसून चहा घेण्याचा आनंद पुन्हा केव्हा मिळेल कोणास ठाऊक. जे आई वडील या धाकाधकीच्या जीवनात आपल्या चिमुकल्या जीवाला वेळ देऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी तर सुवर्ण काळ आहे. ज्यांना कधीपासून स्वतःसाठी वेळ हवा होता त्यांच्यासाठी तर हा दुग्ध शर्करा योग आहे . परिस्थिती गंभीर आहे  पण त्याला हुशारीने सामोर जाण हेच आपण करू शकतो. या नंतर येणाऱ्या Financial Crisis ची  भीती सर्वाना आहेच. पण हे आता एक वैश्वीक सत्य आहे आणि आपल्याला त्याला सामोर जावंच लागणार आहे.  ते म्हणतात ना जान है तो जहान है अगदी तसंच, जर आज आपण आणि आपल कुटुंब जगल तरच आपण सुखी आयुष्य जगू शकतो आणि आपल्या असण्याला अर्थ देऊ शकतो.  आपण कोणी महान नाही तर फक्त या निसर्गाचा, समाजाचा भाग आहोत  आणि आपण त्याच काहीतरी देण लागतो हे लक्षात ठेऊन जगून पाहूया. स्वतःची आणि प्रिय व्यक्तींची  काळजी घेऊन पाहूया. गरजवंतांना आपल्याला जमेल तेवढी मदत करून पाहूया. आपल्या समाजाचा, निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करूया. आपल्या येणाऱ्या पिढीसाठी थोडीतरी स्वच्छ हवा, पाणी ,अन्न, सुंदर निसर्ग आणि माणुसकी राखून ठेवण्याचा प्रयत्न  करूया. जगावरच हे संकट कधी ना कधी दूर होणारच आहे, फक्त या काळात थोड सय्यमाने वागूया. काहीच नाही तर फक्त हे काही दिवस माणूस म्हणून जागून पाहूया….  

डॉ. अश्विनी अल्पेश नाईक

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *