कोरोना आला, ठाण मांडून बसला.
पण अजूनही माणूस नाही खचला.
निसर्गाने समजावून सुध्दा माणूस काही समजेना,
कोरोना काही जगातून जाईना.
कोरोना ने दाखविले जगाचे नवे रूप,
कधी वाटे सुंदर, तर कधी कुरूप.
हातावरचे पोट भुकेने हळहळले,श्रीमंत मात्र डाएट,योगा कडे वळले.
एकदा शेवटचे पाहण्यासाठी, आप्तेष्ट तरसले.
अंत्यसंस्कार करणेही आता कठीण झाले.
गृहिणीची धावपळ जवळून अनुभवली,
तिच्या मॅनेजमेंट स्कीलची सर्वांनाच कमाल वाटली.
राजकारण्यांना मुद्दा मिळाला,
आपणच आपले वाली, हा संदेश सामान्यांना कळला.
कोरोना मुळे झाली मतदारांची उपासमारी,तरी हे राजकारणी राजकारणच करी.
मैलोनमैल चालून अनेक जीव गेले,तरीही अजून अंतर नाही विरले.
स्वतःचे घर नव्याने अनुभवता आले.हरवलेले समाधान मला इथेच सापडले.
अनोळखीसुध्दा मदतीला धावले,सहकार्याने गोष्टी सोप्प्या होतात, पुन्हा सिद्ध झाले.
कधीही न येणारे फोन येऊ लागलेआपुलकीने विचारपूस करू लागले.
सर्वत्र भयावह वातावरण होते,
पण कुटुंबियसोबत आहेत याचे समाधान होते.
चिमुकल्यांसाठी सुगीचे दिवस आले,दिवसरात्र धावणारे आईबाबा काही काळ थांबले.
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.