भोंडला..
भोंडला म्हणजे नक्की काय..! आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रौत्सवाची सुरुवात होते. पण हस्त नक्षत्रात सूर्याने प्रवेश केला की दुसर्या दिवशी हागदा म्हणजेच, भोंडला, सुरू होतो. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.काही ठिकाणी भोंडळा नऊ दिवस, काही ठिकाणी सोळा दिवस खेळला…