Quotes

सप्तरंग प्रेमाचे

सप्तरंगप्रेमाचे – निवारा खरतर कमतरता अशी कशाचीच नव्हती,पण तुझ्या येण्याने विलक्षण असे काही तरी मिळाल्याचा आनंद झाला होता.आयुष्याच्या प्रत्येक वादळात मला जपून ठेवणारा माझा हक्काचा निवारा मला सापडला होता. सप्तरंगप्रेमाचे – साक्ष विश्वासाच्या धाग्यात मैत्रीचे मोती गुंफले , प्रेमाच्या रेशीम गाठीत हे नाते खुलले. सप्तपदी चालून तुझी अर्धांगिनी झाले , तुझ्या माझ्या प्रेमाची साक्ष द्यायला…

100 Words Stories

हेच आहे का माझ्या नशिबात…

यामिनी आजही अशोकशी भांडत होती. ” कुठे नशीब फुटलं, तुमच्यासारख्या पोलिसाशी लग्न केलं मी. ना सणवार, सुखदुख. माझं सोडा पण निदान आज मुलाच्या वाढदिवसादिवशी तरी वेळेत यायचं घरी. माझ्या नशिबी हेच आहे हे मान्य केलं आहे मी,पण मुलाचा तरी विचार करायचा.” अशोक आजही शांतपणे तिला सॉरीच म्हणाला. छोटा अमोघ सर्व ऐकत होता. तो धावतच यामिनिकडे…

Poem

नवरा.

लग्न झाले आणि नवरा नावाचे पात्र आले माझ्या आयुष्यात,त्यांच्या येण्याने जाणवले, नक्की कसली उणीव होती माझ्या या प्रवासात. मी स्वच्छंदी, तो अगदी जबाबदरीने वागणारा.मी थोडी चिडकी, तो सर्व परिस्थिती शांतपणे हाताळणारा.मी थोडी अस्ताव्यस्त, तो अगदी नीटनेटकेपणे जगणारा.मी थोडीशी वेंधळी ,तो जपून पावलं टाकणारा.कधी मला हसवणारा, कधी माझ्या सोबत हसणारा.कधी मला समजवणारा, तर कधी वादविवाद करणारा.मी…

100 Words Stories

आयुष्यातले छोटे हसरे क्षण..

समीर आणि नेहाचे भांडण झाले. नेहा माहेरी गेली. नेहा रुसल्यावर तिची नेहमी समजूत काढणारा समीर आज रागावला होता. त्यामुळे त्यानेही या वेळी फोन न करण्याचा निर्णय घेतला. तिथे नेहा समीरच्या फोनची वाट पाहत होती. नेहाला अस्वस्थ वाटत होते म्हणून ती डॉक्टरकडे गेली. तिथे गेल्यावर कळले ती आई होणार आहे. तिने तडक घरी जायचे ठरविले.समीर घरी…

Quotes

चंद्र

विरहात जळणाऱ्या प्रियकराला, चंद्राला पाहून पडलेला प्रश्न…“आकाशातल्या चंद्राला पाहून मला तुझेच स्मरण का होते?,दुःखाची चव चाखून ही, हे माझे वेडे मन तुझ्याकडेच धाव का घेते?.” ***************************************************************************************************************************** कलेकलेने वाढणाऱ्या चंद्राचे साैंदर्य एखाद्या निसर्ग प्रेमिला विचारा,तसेच कलेकलेने वाढणाऱ्या गर्भाचे सुख एखाद्या आईला विचारा. ***************************************************************************************************************************** हजारो ताऱ्यांच्या सहवासात राहून ही त्याने स्वतः चे वेगळे पण साऱ्यांना पटवून दिले.स्वतः…

Poem

पहिली भेट

आज ही आठवतोय तो दिवस जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटले होते. त्यादिवशी जणू माझ्या अबोल स्वप्नातून कोणीतरी उचलून तुला प्रत्यक्षात आणले होते. क्षणातच पडले नव्हते तुझ्या प्रेमात, पण त्या दिवसापासून तुला नक्कीच गृहीत धरू लागले होते मी माझ्या विचारात. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Poem

बायको आणि नवरा #acrossthebridge

प्रत्येक कुटुंबात असते एक बायको. नवऱ्यावर खूप प्रेम करणारी. सतत त्याच्या दीर्घायुष्यासाठी उपासतापास करणारी. तुझ माझ्यावर प्रेमच नाही अशी तक्रार करणारी. छोट्या गोष्टींवरून रुसून बसणारी. संध्याकाळी त्याच्या वाटेवर डोळे लावून बसणारी. मला माहेरची आठवण येते असे सतत सांगणारी पण सासरी पूर्णपणे रमणारी. वाद घालणारी, दुसऱ्याच क्षणी त्याच्या मिठीत विसावणारी. त्याच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे उभी राहणारी….

Poem

आठवणीतला पाऊस..

आज पावसात भिजताना फार एकटं वाटतं होत.जुन्या आठवणींच सावट पुन्हा एकदा मनात दाटल होत.आजचा पाऊस अगदी आगंतुक पाहुण्यासारख आला, आणि माझ्या हृदयात कधीकाळी शिरकाव करणाऱ्या त्या आगंतुक पाहुण्याची मला आठवण करून गेला. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

100 Words Stories

आयुष्यातले छोटे हसरे क्षण..

राघव जे असेल ते पटकन बोलणारा,तर जुई थोडीशी हळवी,मनातलं लगेच न सांगणारी.असेच एके दिवशी राघवचे ऑफिसमध्ये काहीतरी बिनसले.त्याच रागात तो घरी आला.जुईसुध्दा थोडी वैतागलेली होती.आधी ऑफिस,मग घरची कामं,मुलाचा पसारा,त्यातच सासूबाईंनी तिला जेवणावरून सुनावले होते.राघवने जुईला खुप वेळा विचारून सुध्दा ती काहीच सांगत नव्हती.शेवटी राघव वैतागला आणि तिच्यावर चिडला.जुई रडू लागली.ते पाहून तर त्याला अजून राग…