Stories

माझिया प्रियाला प्रीत कळेना.. भाग २

दुसऱ्या दिवशीची पहाट साजिरीसाठी असंख्य प्रश्न घेऊन आली.. ” खरंच मला विक्रम बद्दल काय वाटतं..? पण हा विचार का करते आहे मी..? माझं आधीच ठरलं आहे प्रेम विवाह नाही करायचा.. आई बाबा म्हणतील तिथेच लग्न करायचं.. पण विक्रमची सोबत … आवडते मला.. त्याचा सहवास आवडतो, त्याच्या सोबत असताना वेळ कसा जातो ते कळत सुद्धा नाही…

Stories

माझिया प्रियाला प्रीत कळेना.. भाग १

विक्रम आणि साजिरीची ओळख प्रितीच्या बर्थडे पार्टीत झाली. साजिरी प्रितीची वर्ग मैत्रिण तर विक्रम तिचा मावस भाऊ. साजिरी दोन वर्षांनंतर प्रितीला भेटली होती. पार्टी संपल्यावरही प्रितीने साजिरीला हट्ट करून अजून थोडा वेळ थांबवून घेतले. विक्रम सुद्धा थांबला होता. प्रिती , साजिरी, विक्रम, साजिरीची बहिण, अजून काही शाळेतले मित्र मैत्रिणी असा गप्पांचा फड रंगला… गप्पा मधून…

Stories

हवी हवीशी अवजड बेडी – सासुरवास.

अखेर जुईने अभिषेकच्या लग्नाचा मुहूर्त निघाला. जुई आणि अभिषेक गेले चार वर्ष एकमेकांच्या प्रेमात होते. एका मैत्रिणीच्या बर्थ डे पार्टी ला दोघांची भेट झाली. पहिल्या भेटीतच अभिषेक तिच्यावर फिदा झाला. मग हळूहळू या ना त्या कारणाने तो मैत्रिणीच्या मदतीने जुईला भेटू लागला. तिला इंप्रेस करण्यासाठी वेग वेगळ्या युक्ती करू लागल्या. जुईला सुध्दा अभिषेकच वागणं कळत…

Quotes

सप्तरंग प्रेमाचे

सप्तरंगप्रेमाचे – निवारा खरतर कमतरता अशी कशाचीच नव्हती,पण तुझ्या येण्याने विलक्षण असे काही तरी मिळाल्याचा आनंद झाला होता.आयुष्याच्या प्रत्येक वादळात मला जपून ठेवणारा माझा हक्काचा निवारा मला सापडला होता. सप्तरंगप्रेमाचे – साक्ष विश्वासाच्या धाग्यात मैत्रीचे मोती गुंफले , प्रेमाच्या रेशीम गाठीत हे नाते खुलले. सप्तपदी चालून तुझी अर्धांगिनी झाले , तुझ्या माझ्या प्रेमाची साक्ष द्यायला…

Stories

रेमंड.. द कंप्लीट मॅन..

श्रावणी आणि श्रीधरचे लग्न आता दोन महिन्यांवर येऊन ठेपले होते. श्रावणी २७ वर्षांची तर श्रीधर ३० चा. दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर. मनमिळावू, मितभाषी, राजबिंडा श्रीधर तर थोडीशी लाजाळू,स्वच्छंदी, हसतमुख श्रावणी. दोघांच्याही आया बालपणीच्या मैत्रीणी. सारच काही तस जुळून ही आलं अन् योग्य ही वाटलं म्हणून या दोघांचं लग्न ठरलं. हे टीपिकल अरेंज मॅरेज नव्हते. पण श्रावणी…

100 Words Stories

आयुष्यातले छोटे हसरे क्षण..

राघव जे असेल ते पटकन बोलणारा,तर जुई थोडीशी हळवी,मनातलं लगेच न सांगणारी.असेच एके दिवशी राघवचे ऑफिसमध्ये काहीतरी बिनसले.त्याच रागात तो घरी आला.जुईसुध्दा थोडी वैतागलेली होती.आधी ऑफिस,मग घरची कामं,मुलाचा पसारा,त्यातच सासूबाईंनी तिला जेवणावरून सुनावले होते.राघवने जुईला खुप वेळा विचारून सुध्दा ती काहीच सांगत नव्हती.शेवटी राघव वैतागला आणि तिच्यावर चिडला.जुई रडू लागली.ते पाहून तर त्याला अजून राग…