एक होता विदुर..
महाभारत म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो श्री कृष्ण,त्या पाठोपाठ पांडव,कौरव,कुंती,कर्ण,द्युत सभा,द्रौपदी, वस्त्रहरण,कुरुक्षेत्र… फारच क्वचित आणि अगदी फार कमी लोकांना विदुर या महाभारतातल्या पात्राची आठवण येते. खरतर मी सुध्दा या विदुराचा एवढा विचार या आधी कधीच केला नव्हता. पण लॉकडाऊनच्या काळात महाभारत पुन्हा एकदा पाहण्याचा योग आला. महाभारतातील पात्र तशी परिचयाचीच होती. कथा…