100 Words Stories

मैत्री

मैत्री.. आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या रूपात भेटते. हे एक असे नाते जे जात – पात,धर्म, वय, नाती गोती, लिंग, भाषा सर्वांच्याशी पलिकडेचे तरी सर्वात जवळचे.काही सवंगडी येतात आपल्या आयुष्यात आणि त्यांचा कार्य भाग संपला की निघूनही जातात.पण काही असतात खूप खास.. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सोबत देतात. आपल्या चुकांसाठी समजावतात,ओरडतात वेळप्रसंगी कान पिळतात, अगदी शिव्या देतात….

Poem

मुलगी – प्रत्येक आई बापाचं शंभर नंबरी सोनं.

मुलगी झाली हो, मुलगी झाली,तिच्या पावलांनी लक्ष्मी घरात आली. तिच्या हास्याने घरात सुख समाधान येईल,तिच्या पैजणांच्या तालावर समृध्दी,ऐश्र्वर्य घरात नांदेल. मोठी होऊन जेव्हा ती सासरी जाईल, तेव्हा माझे हे शंभर नंबरी सोनं तिथेही आपली चमक दाखवेल,सर्वांना आपला लाळा लावेल. तिच्या सद्गुणांनी त्या घराचंही नंदनवन बनवेल,माहेरची ती जान, तर सासरची ती शान बनेल. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Poem

अक्कण माती चिक्कण माती या गाण्यावर आधारित – भोंडल्याचीगाणी

अक्कण माती चिक्कण मातीमाझी सासूबाई सुरेख गं,त्यांचे गोडवे किती गाऊ गं. माझी नणंद बाई सुरेख गं,तिचे कौतुक किती करू गं. माझे सासरे बुवा सुरेख गं,त्यांची स्तुती किती करू गं. माझे नवरोजी सुरेख गं,इश्श.. त्यांचे माझ्यावर खूप खुप प्रेम, त्यांचे किस्से किती सांगू गं. माझे सासर आहे सुरेख गं,किती गोष्टी सांगू गं. माझे माहेर आहे सुरेख…

Poem

विजयादशमी..

रावणावर रामाचा विजय म्हणजे विजयादशमी, महिषासुरावर दुर्गेचा विजय म्हणजे विजयादशमी, असत्यावर सत्याचा विजय म्हणजे विजयादशमी, वाईट प्रवृत्तीवर चांगल्या विचारांचा विजय म्हणजे विजयादशमी, नवीन गोष्टींचा आरंभ म्हणजे विजयादशमी, पाप ,क्रोध, लोभ, मोह, मस्तर, मद,अहंकार, आळस, हिंसा, चोरी यांचा त्याग म्हणजे विजयादशमी. सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्या. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Poem

बाबा..

असतो एक बाबा मुलांवर खुप खुप प्रेम करणारा.मुलांचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी सतत झटणारा.त्याला ज्या ज्या सुखसोयी त्याच्या बालपणी मिळाल्या नाहीत त्या आपल्या मुलांना मिळाव्या म्हणून धडपडणारा.आईला असते चिंता रात्रीच्या जेवणाची,पण आयुष्य भराच्या शिदोरीची तरतूद आधीच करून ठेवणारा.वरून खूप कठोर पण आतून खूप कोमल असणारा.लेकामध्ये स्वतः चे बालपण शोधणारा.लेकीला तळ हाताच्या फोडासारखे जपणारा.स्वतः चा त्रास मुलांपासून…

Poem

आदिशक्ती..

ती आहे पार्वती, ती दुर्गा सुध्दा आहे. एकीकडे ती सुंदरतेचे,चंचलतेचे, नाजुकतेचे प्रतीक आहे,. तर दुसरीकडे ती धाडसी, रणरागिणी सुध्दा आहे. ती वाटते नाजूक, पण तीच आदिशक्ती आहे. नवनिर्मितीचा अधिकार आहे तिला, कारण ते पेलवण्याच सामर्थ्य सुध्दा तिच्यामध्येच आहे. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Poem

पहिली भेट

आज ही आठवतोय तो दिवस जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटले होते. त्यादिवशी जणू माझ्या अबोल स्वप्नातून कोणीतरी उचलून तुला प्रत्यक्षात आणले होते. क्षणातच पडले नव्हते तुझ्या प्रेमात, पण त्या दिवसापासून तुला नक्कीच गृहीत धरू लागले होते मी माझ्या विचारात. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Poem

गैरसमज

जीवनाच्या वाटेवर अजुन पर्यंत एकटं चालायची सवय नव्हती,पण आता करावी लागेल.तुझ्याविना आता हे पहाडा एवढं आयुष्य मला एकटच जगावं लागेल.तुझ्यात आणि माझ्यात सुरू असलेले हे गैरसमजच पर्व कदाचित आता कधीच संपणार नाही.कळत नकळत पने तू मला किती दुखावले आहेस हे तुला कधीच कळणार नाही.

Poem

…ती असते आई

क्षणभरासाठी असते ती पत्नी, अनंत काळाची असते ती आई.बाळाचे चरित्र घडवत असताना स्वतः चे अस्तित्व विसरून जाते ती असते आई. कधी ओरडते, कधी प्रेमाने जवळ घेते ती असते आई.छोट्या चुकीसाठी कान पकडते, पण मोठे अपराध सुध्दा स्वतः च्या पोटात घेते ती असते आई, हसते, हसविते, रडते,कधी बागडते, कधी पडते, कधी धडपडते,कधी चुकते, सतत नवीन काही…

Poem

बायको आणि नवरा #acrossthebridge

प्रत्येक कुटुंबात असते एक बायको. नवऱ्यावर खूप प्रेम करणारी. सतत त्याच्या दीर्घायुष्यासाठी उपासतापास करणारी. तुझ माझ्यावर प्रेमच नाही अशी तक्रार करणारी. छोट्या गोष्टींवरून रुसून बसणारी. संध्याकाळी त्याच्या वाटेवर डोळे लावून बसणारी. मला माहेरची आठवण येते असे सतत सांगणारी पण सासरी पूर्णपणे रमणारी. वाद घालणारी, दुसऱ्याच क्षणी त्याच्या मिठीत विसावणारी. त्याच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे उभी राहणारी….