ती
त्याने तिला लग्ना साठी विचारले, आणि ती पूर्णपणे हुरळून गेली. का नाही जाणार..असही घरच्या वातावरणाला कंटाळली होती ती. दारूडा बाप, वाया गेलेला भाऊ आणि या सगळ्याला कंटाळून आई ने स्वतः साठी शोधलेला मर्यादे बाहेरचा मार्ग .. या सगळ्याचा कंटाळा आला होता तिला.

