Quotes

सप्तरंग प्रेमाचे

सप्तरंगप्रेमाचे – निवारा खरतर कमतरता अशी कशाचीच नव्हती,पण तुझ्या येण्याने विलक्षण असे काही तरी मिळाल्याचा आनंद झाला होता.आयुष्याच्या प्रत्येक वादळात मला जपून ठेवणारा माझा हक्काचा निवारा मला सापडला होता. सप्तरंगप्रेमाचे – साक्ष विश्वासाच्या धाग्यात मैत्रीचे मोती गुंफले , प्रेमाच्या रेशीम गाठीत हे नाते खुलले. सप्तपदी चालून तुझी अर्धांगिनी झाले , तुझ्या माझ्या प्रेमाची साक्ष द्यायला…

Quotes

नशीब

ज्यांचा स्वतः वर विश्वास नसतो ते नेहमी नशिबाला दोष देत राहतात. डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

Quotes

संयम

कठीण दिवस ही निघून जातील,निरुत्तर प्रश्नांची उत्तरं जरूर मिळतील.संयमाने योग्य क्षणाची वाट पाहावी ,नशिबाची बंद कवाडे नक्की उघडतील. ********************************************************************************************************************* प्रतिकूल परिस्थितीत माणसाने दाखवलेला संयम त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवतो. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Quotes

तुळस.

तुळस म्हणजे पूजनीय आणि पवित्र अशी गुणकारी औषधी वनस्पती.मांगल्याचे प्रतीक म्हणून आहे तिची ख्याती.‘क्विन ऑफ हर्ब्स’ म्हणून आहे तिची महती.सकारात्मक उर्जेचा स्त्रोत म्हणून दारोदारी लावली जाते ही वनस्पती. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Quotes

उमेद

असंख्य संकटे येऊनही जो परिस्थिती पुढे हतबल न होता यशाची उमेद सोडत नाहीत आणि प्रयत्नशील राहतो तोच नेहमी यशस्वी होतो. ***************************************************************************************************************************** आशावादी माणूस त्याच्या संघर्षातून यशाची उमेद निर्माण करतो. ***************************************************************************************************************************** आठवणी कधी सुखद असतात तर कधी दुःखद. दुःखद आठवणी ह्या नेहमी बोचतात पण काळाच्या ओघात भरून निघतात. तर सुखद आठवणी नेहमीच ताजातवान करतात आणि जगण्याची…

Quotes

पणती.

एका छोट्याश्या पणतीचा प्रकाश सुध्दा अंधारात आधार देतो, तसेच सकारात्मक विचार नेहमी आशावादी राहण्यास मदत करतात. ©️®️ डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Quotes

ऊन.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सुख दुःखाचे क्षण हे अगदी ऊन आणि सावली सारखे असतात. जसं ऊन सरून सावली येतेच तसेच दुःख संपून सुख हे येतच, हा विचार मनात ठेऊन आपण नेहमी प्रयत्नशील, आणि आशावादी राहावे. डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

Quotes

शस्त्र.

माणसाने शब्द नेहमी जपून वापरावेत, कारण शब्दांसारखे शस्त्र नाही. ते एखादं युद्ध सुरू ही करू शकतात किंवा सुरू असलेले युद्ध थांबवू ही शकतात. **************************************************** लेखणी हे कुठल्याही लेखकाचे शस्त्र असते. मोम्सप्रेसो ने असंख्य लेखिकांना एक व्यासपीठ देऊन त्यांच्या लेखणी रुपी शस्त्रच्या ताकदीची त्यांना अनुभुती करून दिली. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Quotes

सोनं

ज्ञान, परिश्रम आणि सद् विवेक बुध्दीच्या जोरावर माणूस मिळालेल्या संधीच सोनं करू शकतो. **************************************************** पालकांना त्यांच्या चिमुकल्यांसोबत घालवलेला काळ हा सोन्यासारखाच भासतो. **************************************************** शेतकरी शेतात स्वतः चा घाम गाळून धान्य रुपी सोनंच पिकवत असतो. त्या अन्नाचा आणि शेतकऱ्यांचा आपण आदर केला पाहिजे. **************************************************** जेव्हा योग्य व्यक्ती जोडीदार म्हणून लाभतो तेव्हा संसारातील प्रत्येक क्षण सोन्यासारखा लख्ख…