Poem

माझ्या लहानपणी..

माझ्या लहानपणी होते आमचे छोटेसे चाळीतले घर,आताच्या दोन बेडरूम टेरेस फ्लॅटला सुध्दा नाही येणार त्याची सर.त्या छोट्याश्या घरात खुप समाधान आणि समृद्धी होती.काळजी,चिंता,भीती या सर्वांची तिथे जागा नव्हती.माझ्या लहानपणी चाळ नावाची वाचाळ वस्ती नव्हती.तिथे एकमेकांना मदत करणारी,कठीण प्रसंगी धावून येणारी,आनंदात सहभागी होणारी जीवाभावाची माणसे होती.माझ्या लहानपणी प्रत्येक गोष्टीचे एक वेळापत्रक असायचे.पाणी कधी येणार,जेवायला कधी बसायचे,खेळायला…

Poem

पणती.

एक पणती ज्ञानाची लावू.एक पणती समानतेची लावू.एक पणती समाधानाची लावू.एक पणती निसर्गाच्या रक्षणाची लावू.एक पणती साक्षरतेची लावू.एक पणती प्रेमाची लावू.एक पणती माणुसकीची लावू.चला खऱ्या अर्थाने ही दिवाळी तेजोमय बनवू. ©️®️डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

Poem

सण आला दिवाळीचा.

सण आला दिवाळीचा,आनंद, चैतन्य आणि रोषणाईचा. सण आहे हा वात्सल्याचा, धन्वंतरीच्या आराधनेचा, लक्ष्मीच्या पूजनाचा.बहीण भावा मधल्या जिव्हाळ्याचा,पती पत्नी मधल्या प्रेमाचा. उत्सव आहे हा नात्यांचा. सध्याचा काळ आहे थोड खबरदारीने आणि जबाबदारीने वागण्याचा. स्वतः ची आणि स्वकियांची काळजी घेण्याचा. यंदाही जल्लोषात साजरा करू हा सण दिवाळीचा. पण अवलंब करू नवीन पद्धतींचा. सण साजरा करताना पाळू नियम…

Poem

नवरा.

लग्न झाले आणि नवरा नावाचे पात्र आले माझ्या आयुष्यात,त्यांच्या येण्याने जाणवले, नक्की कसली उणीव होती माझ्या या प्रवासात. मी स्वच्छंदी, तो अगदी जबाबदरीने वागणारा.मी थोडी चिडकी, तो सर्व परिस्थिती शांतपणे हाताळणारा.मी थोडी अस्ताव्यस्त, तो अगदी नीटनेटकेपणे जगणारा.मी थोडीशी वेंधळी ,तो जपून पावलं टाकणारा.कधी मला हसवणारा, कधी माझ्या सोबत हसणारा.कधी मला समजवणारा, तर कधी वादविवाद करणारा.मी…

Poem

शरद पौर्णिमा

आश्विन मासी उगवला चंद्र पुनवेचा,भारतीय संस्कृती नुसार हा दिवस आहे खुप महत्वाचा. कोणी म्हणते शरद पौर्णिमा तर कोणी म्हणते कोजागिरी,तर कुठे हिला संबोधले जाते माणिकेथारी (मोती तयार करणारी). कोजागिरीचा अर्थच बघा किती खोल आहे,‘कोण सजग आहे, ज्ञानासाठी आतुर आहे’ असे लक्ष्मी देवी विचारात आहे. शरद ऋतूतील ही पौर्णिमा आहे सर्वांना वेध लावणारी.प्राचीन, धार्मिक, खगोलिक, सांस्कृतिक…

Poem

मुलगी – प्रत्येक आई बापाचं शंभर नंबरी सोनं.

मुलगी झाली हो, मुलगी झाली,तिच्या पावलांनी लक्ष्मी घरात आली. तिच्या हास्याने घरात सुख समाधान येईल,तिच्या पैजणांच्या तालावर समृध्दी,ऐश्र्वर्य घरात नांदेल. मोठी होऊन जेव्हा ती सासरी जाईल, तेव्हा माझे हे शंभर नंबरी सोनं तिथेही आपली चमक दाखवेल,सर्वांना आपला लाळा लावेल. तिच्या सद्गुणांनी त्या घराचंही नंदनवन बनवेल,माहेरची ती जान, तर सासरची ती शान बनेल. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Poem

फेर धरू गं, फेर धरू ( भोंडल्याची गाणी)

फेर धरू गं फेर धरू, चला आता खेळ खेळू.रथाच्या पुढे घोडे चालत आहेत, हत्तीच्या चित्कारांनी जिचे अस्तित्व जाणवत आहे, अशा लक्ष्मी मातेला वंदन करू.भूलाबाईचा उत्सव साजरा करू,सुख दुःख सारे बाजूला ठेऊ.फेर धरू गं फेर धरू, चला आता खेळ खेळू. स्वतःसाठी जरा नटूथटू ,स्वतः साठी जरा वेळ काढू.पती राजाचे थोडे कौतुक करू, माहेर आणि सासरचे गोडवे…

Poem

दसरा.. – आपल्यातला रावण कुठवर जगणार?

दरवर्षी माणूस पुतळा रुपी रावणाचे माणूस दहन करतो पण त्याच्या अंतरी असलेला रावण मात्र त्याच्यावर हसतो.अरे माणसा.. तुझ्यात लपला आहे रावण, त्याला कोण मारणार?रोज कानावर बातमी येते स्त्री भ्रूण हत्येची, अत्याचाराची, बलात्काराची… तिचे लचके कुठवर तोडणार..?हे असे कधी पर्यंत चालणार..?प्रत्येक युगात तिला द्यावी लागली आहे अग्नी परीक्षा.. हा समाज तिला चरित्र हिन कुठवर ठरवणार ..?हे…

Poem

अक्कण माती चिक्कण माती या गाण्यावर आधारित – भोंडल्याचीगाणी

अक्कण माती चिक्कण मातीमाझी सासूबाई सुरेख गं,त्यांचे गोडवे किती गाऊ गं. माझी नणंद बाई सुरेख गं,तिचे कौतुक किती करू गं. माझे सासरे बुवा सुरेख गं,त्यांची स्तुती किती करू गं. माझे नवरोजी सुरेख गं,इश्श.. त्यांचे माझ्यावर खूप खुप प्रेम, त्यांचे किस्से किती सांगू गं. माझे सासर आहे सुरेख गं,किती गोष्टी सांगू गं. माझे माहेर आहे सुरेख…

Poem

विजयादशमी..

रावणावर रामाचा विजय म्हणजे विजयादशमी, महिषासुरावर दुर्गेचा विजय म्हणजे विजयादशमी, असत्यावर सत्याचा विजय म्हणजे विजयादशमी, वाईट प्रवृत्तीवर चांगल्या विचारांचा विजय म्हणजे विजयादशमी, नवीन गोष्टींचा आरंभ म्हणजे विजयादशमी, पाप ,क्रोध, लोभ, मोह, मस्तर, मद,अहंकार, आळस, हिंसा, चोरी यांचा त्याग म्हणजे विजयादशमी. सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्या. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.