विक्रम आणि साजिरीची ओळख प्रितीच्या बर्थडे पार्टीत झाली. साजिरी प्रितीची वर्ग मैत्रिण तर विक्रम तिचा मावस भाऊ. साजिरी दोन वर्षांनंतर प्रितीला भेटली होती. पार्टी संपल्यावरही प्रितीने साजिरीला हट्ट करून अजून थोडा वेळ थांबवून घेतले. विक्रम सुद्धा थांबला होता. प्रिती , साजिरी, विक्रम, साजिरीची बहिण, अजून काही शाळेतले मित्र मैत्रिणी असा गप्पांचा फड रंगला…
गप्पा मधून विक्रम आणि साजिरी यांची ओळख झाली. साजिरी काही दिवसांपूर्वीच मायदेशी परत आली होती.उच्च शिक्षणासाठी दोन वर्षांसाठी ऑस्ट्रेलियाला गेली होती. आता ती काही परत मायदेशात येणार नाही असे सर्वांनाच वाटत होते. पण तिथेच नोकरी न करता तिने पुन्हा मायदेशी यायचे असे आधीच ठरवले होते आणि तिने अगदी तसेच केले. योगायोगाने विक्रमने सुद्धा ऑस्ट्रेलियाच्या त्याचं युनिव्हर्सिटीतून मास्टर्स कंप्लीट केले होते. त्याने नंतर तिथे दोन वर्ष नोकरीही केली पण त्याच मन तिथे रमलं नाही म्हणून मग तो ते सारं सोडून मायदेशी परत आला .. आणि आता एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम करत होता. मूळचा नशिककर होता पण आता प्रितीच्या घराशेजारीच शिफ्ट झाला होता. साजिरी सुद्धा आता उत्तम संधीच्या शोधात होती. विक्रमच्या कंपनीत तिला हव्या असलेल्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू सुरू होते. त्याने साजिरीला सुद्धा इंटरव्ह्यू देण्याचे सजेस्ट केले.
साजिरीने इंटरव्ह्यू दिला आणि ती सिलेक्ट सुद्धा झाली. विक्रमचे तिने खूप आभार मानले.विक्रम आणि ती आता एकाच कंपनीमध्ये पण वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये काम करत होते. ते रोज एकमेकांना भेटू लागले. लंच सोबत करू लागले. सोबत शॉपिंग करू लागले. ऑफीस नंतर सुध्दा एकमेकांसोबत वेळ घालवू लागले. ते एक दिवस भेटले नाही असं कधीच झाल नाही.. त्यांच्या आवडी निवडी सारख्या होत्या.. त्यामुळे त्या दोघांनाही एकमेकांचा सहवास आवडू लागला होता .साजिरी आणि प्रिती यांचा शाळेचा एक गृप होतच त्यात आता विक्रम पण सामील झाला. विकेंड ट्रीप ना जाणं, ट्रेक ना जाणं सुरू झालं. विक्रमचा विकी तर साजिरीची साज कधी झाली हे त्यांचं त्या दोघांना हि कळलं नाही.
साजिरी म्हणजे सौंदर्याचा खजिना नव्हती.. पण चार चौघात उठून दिसेल अशी होती. गोरीपान, काळेभोर डोळे, खांद्या पर्यंत येणारे कुरळे केस, चाफेकळी नाक, नेहमी गुलाबी किंवा लाल रंगाच्या लिपस्टिकच्या शेड्सनी रंगवलेले सुंदर ओठ.. पण उंची .. अगदी पाच फूट.. तर विक्रम म्हणजे रांगडा गडी… पिळदार शरीर, घारे डोळे, नेहमी जेल लावून सेट केलेले केस, गव्हाळ वर्ण, मजबूत बाहू, त्यात पाच फूट अकरा एवढी उंची… अगदी स्टायलिश… ऑफीस मधल्याच काय तर त्यांच्या ग्रुप मधल्या मुली सुद्धा हातधुवून पाठी लागल्या होत्या त्याच्या.
साजिरी आई वडिलांची एकुलती एक मुलगी.. खूप लाडात पण तितक्याच संस्कारात वाढलेली. थोडी अल्लड होती पण तितकीच समजूतदार. मॅचींग कुर्त्यावर मॅचिंग चप्पल, हेअर क्लिप्स ते अगदी मॅचिग नेलपेंट लावायची. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश असायची. कधीतरी पिझाच खाऊ तर कधी टपरी वरचा चहाच पिऊ असा आग्रह धरायचा.. तर विक्रम खूप सुलजलेला , समजूतदार, जबाबदारीने वागणारा तरुण.. साजिरी आणि त्याची आवडी निवडी सारख्या असल्या तरी बऱ्याच गोष्टींमध्ये एकमेकांपासून भिन्न होते..
साजिरीच्या घरी आता तिच्या लग्नासाठी स्थळ शोधणं सुरू झालं. साजिरीने ही गोष्ट विक्रमच्या कानावर घातली.. पण हे ऐकल्या पासूनच तो अस्वस्थ झाला. त्याला अन्न गोड लागेनास झाल. ‘ साजिरीच्या लग्नासाठी स्थळ शोधताहेत हे ऐकून आपल्या एवढा त्रास होतो आहे तर तिचं लग्न झालं तर आपल काय होईल ‘, या विचाराने तो बैचेन झाला.. त्याने लगेच प्रितीला फोन करून त्याच्या घरी बोलावून घेतले.. प्रितीला भेटून त्याने त्याची अस्वस्थता सांगितली.. प्रिती त्याच्यावर हसूच लागली..
” अरे भावड्या.. यु अर इन लव्ह माय बॉय.. ” प्रिती म्हणाली..
” काहीतरीच काय..” विक्रम तिच्यापासून नजर चोरत म्हणाला..
” ए प्लिज हा.. आता तुला हे ठाऊक नाही अस नको बोलू.. तुला माझ्याकडून हेच ऐकायचं होत, म्हणून तू मला इथे बोलावलं आहे.. ” प्रिती म्हणाली.
” अग म्हणजे हो.. मला पण हे कळत आहे.. पण कोणाकडून तरी खात्री करून घ्यायची होती.. म्हणूनच तुला बोलावलं.. काय करू मी आता..?” विक्रम अगदी केविलवाणा चेहरा करून म्हणाला.
” अरे काय करू म्हणजे काय… आम्हाला सर्वांना तर खूप आधी पासूनच हे माहीत होत.. तुम्ही दोघं सुद्धा एकमेकांसोबत जसे असता ते पाहून कोणालाही कळेल हे.. तुला हे आता कळत आहे ही आश्चर्याची गोष्ट आहे .” प्रिती म्हणाली.
” पण साजच काय…?” विक्रम म्हणाला.
” अरे असा कसा रे तू.. तिच्याही मनात हे असणारच ना.. म्हणूनच लग्नासाठी स्थळ शोधायला सुरुवात करणार आहेत तेव्हाच तिने तुला सांगितलं.. समजने वाले को इशारा काफी होता है .. आता लवकरात लवकर तुझ्या साजला विचार.. आणि लग्न करून टाक..” प्रिती अगदी उत्साहाने म्हणाली..
” तिच्या मनात पण हेच असेल ना…?” विक्रमने पुन्हा प्रितीला विचारलं..
“हो रे.. तू निश्चिंत होऊन विचार तिला..एक काम करतोस का…असेही दोन महिन्यानंतर आपण हिमाचलला चाललो आहोत.. तू तिथेच तिला विचार . म्हणजे अगदी मेमोरेबल क्षण होईल तो..” प्रिती म्हणाली..
” नको नको.. मी विचार करतो आहे, ज्या दिवशी आम्ही पहिल्यांदा भेटलो त्याचं दिवशी विचारेन मी तिला..” विक्रम म्हणाला..
” यू मीन टू से माझ्या बर्थ डे ला..? म्हणजे परवा..? ” प्रिती म्हणाली..
” हो.. परवाच.. तुझ्या बर्थ डे पार्टी नंतर विचारेन मी तिला..” विक्रम म्हणाला..
” वाह वाह.. क्या बात है.. उतावळा नवरा… बरं ठीक आहे..पण काही प्लॅन आहे का..? की त्यात पण मी मदत करू..?” प्रितीने विचारले.
” मी विचार करतो आहे की डायमंड रिंग घेईन..” विक्रम म्हणाला.
” मी एक सजेस्ट करू का.. डायमंड रिंग तुमच्या एन्गेजमेंटला घे.. आता छान प्लॅटिनम बँड घे.. छान वाटत ते.” प्रिती म्हणाली..
” चांगली आयडिया आहे.. तसच करतो.. आता चल माझ्यासोबत शॉपिंग ला. ‘ अस म्हणून विक्रम प्रितीला शॉपिंगसाठी घेऊन गेला .
मधला हा एक दिवस त्याच्यासाठी असह्य झाला होता. ऑफीस मध्ये लंच ब्रेक मध्ये साजिरी त्याला भेटली तेव्हा आताच हिला विचारतो असे झाले होते त्याचे , पण त्याने स्वतःला आवरले.. प्रितीच्या बर्थडे पार्टीची घरी तयारी सुरू होती. पण विक्रमचे त्यात लक्षच नव्हते. बर्थ डे पार्टी सुरू झाली..
विक्रमने छान रेड कलरचा रेशमी कापड असलेला शर्ट आणि ब्लॅक पँट घातली होती. शर्टचे स्लीव एल्बो पर्यंत फोल्ड केले होते. केस नेहमी प्रमाणे जेल लाऊन सेट केले होते. एकदम स्मार्ट दिसत होता. त्याचं लक्ष दार कडेच होत.. इतक्यात साजिरी आली… रॉयल ब्ल्यू कलरचा वन पीस, कानात डायमंड स्टड, गळ्यात एक सर असलेला ,गळ्याभोवती थोडा फिट बसेल असा डायमंड नेकलेस, केसांचा मेसी बन, डोळ्यात काजळ, ओठांवर लाल रंगाची मॅट लिपस्टिक, पायात सिल्वर कलरचे स्टिलेटोस्, तिला पाहून विक्रम आसपास काय सुरू आहे तेच विसरून गेला. ती चालत चालत प्रितीकडे गेली . प्रितीला तिने विश केलं आणि मग ती विक्रम जवळ गेली. विक्रम क्लिन बोल्ड झाला होता. त्यांच्यात थोड्या फार गप्पा झाल्या. विक्रम पार्टी संपायची आतुरतेने वाट पाहत होता. दोन तासांनी शेवटी एकदाची पार्टी संपली.
“मी तुला सोडायला घरी येतो..” विक्रम म्हणाला.
” अरे मी सुद्धा कार आणली आहे.. तू नको उगाच त्रास करून घेऊस. ” साजिरी म्हणाली.
” अच्छा चल पार्किंग लॉट पर्यंत येतो..” असे म्हणून विक्रम साजिरी सोबत निघाला..
वाटेत काय बोलू , कुठे बोलू याचाच विक्रम विचार करत होता.. तो साजिरीशी काहीच बोलत नव्हता.. ते पार्किंग लॉट पर्यंत पोहोचले सुद्धा..
” काय झालं आहे विकी.? तब्येत ठीक नाही का..? आज काहीतरी वेगळाच वागतो आहेस..” साजिरी म्हणाली.
” साज….. एमएमएमएमएमएमएमएमएम… काही नाही..” विक्रम बोलता बोलता गप्प झाला.
” अरे बोल ना..” साजिरी म्हणाली.
” ओक.. सांगतो.. खूप काही तरी स्पेशल करून तुला सांगेन अस ठरवल होतं मी.. पण आता असच सांगतो.. मला तू फार आवडतेस.. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे.. करशील का लग्न माझ्याशी..” विक्रम खिशातून साजिरीसाठी घेतलेला बँड काढून तिच्यासमोर गुडघ्यावर बसत हे म्हणाला..
” अरे उठ.. प्लिज.. मी कधीच तुझा असा विचार केला नाही.. तू माझा खूप छान मित्र आहेस.. आवडतोस तू मला.. पण मी हे अस..” विक्रमला उठवत साजिरी म्हणाली.
” आवडतोस म्हणजे.. ” विक्रम गोंधळला.
” आई बाबांच्या परवानगीनेच आणि ते सांगतील तिथेच लग्न करायचं असं मी ठरवल आहे.. मला तू आवडते.. तू माझ्या आई बाबांना भेट.. मला रीतसर मागणी घाल.. तेही तुला ओळखतातच.. नाही नाही म्हणणार ते..” साजिरी म्हणाली.
” ते ठीक आहे .. तू होकार दिलास तर माझी पुढची स्टेप तिचं असेल. रीतसर मागणी घालणाराच आहे मी.. पण तुझा निर्णय काय आहे..?” विक्रमने साजिरीला विचारले..
” आई बाबा जे म्हणतील तेच..” साजिरी म्हणाली..
” अग तुझ काहीच मत नाही का..? विक्रमने तिला विचारले .
” आई बाबा म्हणतील तसच …” साजिरी पुन्हा म्हणाली.
” तुझ माझ्यावर प्रेम आहे की नाही आणि तुला माझ्या सोबत आयुष्य घालवायचं आहे की नाही हे मला जाणून घेणं जास्त गरजेचं वाटतं .” विक्रम म्हणाला.
” मला नाही माहित.. तू घरी येऊन रीतसर मागणी घाल ना..” साजिरी पुन्हा तेच म्हणाली..
” आय एम सॉरी साज पण जिथे तूच अजून कन्फ्युज आहेस तिथे मी तुझ्या आई बाबांशी काय बोलणार..मी जातो..” असे म्हणून विक्रम तिथून निघून गेला..
साजिरीने विक्रमला थांबवायचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही..
साजिरी रडत रडत घरी गेली. इथे प्रिती विक्रम ची वाट पाहत होती.. पण विक्रम प्रितीच्या घरी न जाता स्वतः च्या घरी निघून गेला.. काहीतरी बिनसलं असाव याचा प्रितीला अंदाज आला म्हणून ती विक्रमच्या घरी गेली..
” भावडया अरे काय झालं..? ” प्रितीने विचारले.
झालेला सर्व प्रकार त्याने तिला सांगितला.
” अरे मग कुठे अडत आहे.. तुला असही तिच्याशी लग्नच करायचं आहे.. ती म्हणते तशी रीतसर मागणी घाल.. तिचे आई बाबा ओळखतात तुला. मला ओळखता.. आपल्या पूर्ण फॅमिलीला ओळखतात.. त्यांना साजिरी साठी तुझ्यासारख चांगल स्थळ शोधून पण सापडणार नाही.. ते नकार देणारच नाहीत..” प्रिती म्हणाली.
” मुद्दा तो नाही आहे.. मला साज काढून होकार अपेक्षित होता. घरचे म्हणाले म्हणून लग्न झाल असं मला नको आहे.. तिचा होकार आल्याशिवाय मी तिच्या आई बाबांना भेटणार नाही.. ” विक्रम म्हणाला..
” अरे पण का..? ती अल्लड आहे थोडी यू क्नो हर वेरी वेल…” प्रिती म्हणाली..
” बघ मी हे ठरवल आहे.. बस हेच फायनल आहे.. आता चर्चा नको.. तू जा घरी .. मावशी वाट बघत असेल..” विक्रम म्हणाला..
प्रिती तिथून निघाली.. प्रिती , विक्रम ,साजिरी या तिघांनाही त्या रात्री शांत झोप लागली नाही..
पुढे काय होणार त्याची उत्सुकता वाढली असेल ना..??? पुढील भाग नक्की वाचा.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.