माझिया प्रियाला प्रीत कळेना.. भाग २
दुसऱ्या दिवशीची पहाट साजिरीसाठी असंख्य प्रश्न घेऊन आली.. ” खरंच मला विक्रम बद्दल काय वाटतं..? पण हा विचार का करते आहे मी..? माझं आधीच ठरलं आहे प्रेम विवाह नाही करायचा.. आई बाबा म्हणतील तिथेच लग्न करायचं.. पण विक्रमची सोबत … आवडते मला.. त्याचा सहवास आवडतो, त्याच्या सोबत असताना वेळ कसा जातो ते कळत सुद्धा नाही…