जियाला तिचं घर कधीच आवडल नाही.एकतर तीन खोल्यांचं घर,त्यात राहणारी माणसं सहा.घरात आपला एक कोपरा हवा अस तिला नेहमी वाटे.
पुढे कामानिमित्त तिला हॉस्टेलवर राहावे लागले.डब्बल शेअरिंगची ती रूम पाहून ती खुश झाली.स्वतंत्र बेड,टेबल,कपाट,तिला हवं ते सार होत.पण तिला घरची आठवण येऊ लागली.तिची झोपच उडाली.
दोन महिन्यांनी ती घरी गेली तेव्हा तिचं हे न आवडत घर तिला वेगळं भासल.छोट असलं तरी त्यात एक वेगळंच समाधान होत,अगदी आतुरतेने तिची वाट पाहत असलेली तिची माणसं होती.त्या घरातला कुठला एक कोपरा तिचा नव्हता तर घरातला प्रत्येक कोपरा तिचाच होता.
आज जियाला जाणवले घर मोठमोठ्या खोल्यांनी नाही बनत. खूप दिवसांनी तिला शांत झोप लागली.
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.