100 Words Stories

नवीन सुरूवात..

प्रियाच्या आईला आता प्रियाच्या लग्नाचे वेध लागले होते. पण प्रियाला आईच्या लग्नाचा घाट घालायचा होता,पण तिच्या आईला हे मान्य नव्हते. प्रिया लहान असताना तिचे आई बाबा वेगळे झाले.पूर्वी अधेमध्ये बाबा यायचे भेटायला पण नंतर तेही येईनासे झाले. त्यांनी दुसर लग्न केलं आणि ते स्वतःच्या आयुष्यात रमले. पण आई मात्र प्रियाचे भविष्य उज्ज्वल बनविण्यात गुंतली होती….

100 Words Stories

क्षितिज

क्षितिज म्हणजे फक्त एक भास,आकाश आणि जमिनीच्या भेटीचा तो असतो केवळ एक आभास. ***************************************************************************************************************************** आकाशात रंगांची उधळण करीत अस्ताला जाणारा सूर्य नेहमीच मनाला भावतो.क्षितिजावर त्याला रोखून ठेवावे इतका तो सुरेख वाटतो.आयुष्यातल्या सुंदर आनंदी क्षणांचेही असेच असते,खुप रोखावेसे वाटते त्यांना, पण आपल्या हाती काहीच नसते.