100 Words Stories

उत्तरायण.

तिचा स्वभाव,विचार त्याला आवडू लागले. दोघांच्याही जोडीदाराचं खुप वर्षापूर्वीच निधन झालं होत. त्यांच्या नंतर यांनी मुलांचे योग्य रीतीने संगोपन केले. आता मुले मोठी झाली, स्वतःच्या जगात रमली होती. सर्वांमध्ये असूनही हे दोघे मात्र एकटेच होते. आयुष्याच्या उत्तरायणात तिची सोबत असावी असे त्याला वाटत होते. त्याने तिला लग्नासाठी विचारले.तिच्या मुलांच्या कानावर ही गोष्ट पडली. या वयात…

Quotes

दिवा.

लेकी सूनांचे कर्तुत्व पाहून, त्यांचे महत्त्व आता सर्वांच्या लक्षात येऊ लागले आहे.दिव्या सोबतच पणती सुध्दा घर तेजोमय करू शकते, हे आता सर्वांना उमजू लागले आहे.

Quotes

आईचा गोंधळ..

घालुनी आईचा गोंधळ, सर्व दुःख दारिद्र्य, ईडा पीडा दूर ने, हे साकडे तिला घालू,नवरात्रीतच नाही तर,पूर्ण वर्ष भर स्त्रीच्या प्रत्येक रूपाचा आदर करण्याचा संकल्प घेऊ. ***************************************************************************************************************************** माहेरी असताना आईचा नेहमी होणारा गोंधळ पाहून ती कधी हसली, तर कधी वैतागली.पण स्वतःच्या मुलांच्या मागेपुढे करताना, आता तिला तिच्या आईच्या मनस्थितीची जाणीव होऊ लागली. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.