Poem

बाबा..

असतो एक बाबा मुलांवर खुप खुप प्रेम करणारा.मुलांचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी सतत झटणारा.त्याला ज्या ज्या सुखसोयी त्याच्या बालपणी मिळाल्या नाहीत त्या आपल्या मुलांना मिळाव्या म्हणून धडपडणारा.आईला असते चिंता रात्रीच्या जेवणाची,पण आयुष्य भराच्या शिदोरीची तरतूद आधीच करून ठेवणारा.वरून खूप कठोर पण आतून खूप कोमल असणारा.लेकामध्ये स्वतः चे बालपण शोधणारा.लेकीला तळ हाताच्या फोडासारखे जपणारा.स्वतः चा त्रास मुलांपासून…

100 Words Stories

स्मशान..

अरेरे..स्वतःची काय ही अवस्था करून ठेवली आहे माणसाने!!मरण असंही स्वस्त झालंच होत.पूर्वी निदान काही लोक तरी यायची अंत्ययात्रेला.मेलेल्या माणसाबद्दल चार चांगल्या गोष्टी बोलायचे,थोडी हळहळ व्यक्त करायचे,आता तेही बंद झालं आहे.इन मीन चार जण येतात आता अंत्यविधीसाठी. चला चार टाळकी येताना दिसताहेत..बघुया काय बोलत आहेत ते..अरे बापरे..ह्यांना तर काही सुख दुःखच नाही..डोळ्यात एक टिपूरपण नाही.काय म्हणताहेत…

Quotes

दुर्गा.

मंदिरात जाऊन दुर्गेची आराधना करण्याआधी घरातल्या, समाजातल्या तिच्या वेग वेगळ्या रुपांचा आदर केला तरी ती दुर्गा प्रसन्न होईल. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Poem

आदिशक्ती..

ती आहे पार्वती, ती दुर्गा सुध्दा आहे. एकीकडे ती सुंदरतेचे,चंचलतेचे, नाजुकतेचे प्रतीक आहे,. तर दुसरीकडे ती धाडसी, रणरागिणी सुध्दा आहे. ती वाटते नाजूक, पण तीच आदिशक्ती आहे. नवनिर्मितीचा अधिकार आहे तिला, कारण ते पेलवण्याच सामर्थ्य सुध्दा तिच्यामध्येच आहे. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Stories

तिचे सौंदर्य.. – भाग २

क्रमशः तिने डोळे उघडले तेव्हा ती हॉस्पिटल मध्ये होती. असंख्य वेदना होत होत्या तिला.गुडघ्या पासून ते पोटा पर्यंतचा भाग, उजवा हात , तसेच चेहेऱ्याच्या उजव्या बाजूचा थोडा फार भाग भाजला होता. शेजाऱ्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये आणले होते हे तिला डॉक्टर्स काढून कळले. सध्या घरातल्या कोणालाच भेटायची परवानगी नव्हती. तिने सर्वात आधी विचारले,’ माझा नवरा कुठे आहे?’…

Stories

तिचे सौंदर्य.. भाग १

गोष्ट १९९० ची आहे. नरेश आज लग्नासाठी स्थळं पाहायला जाणार होता. अनुराधा नावं होते मुलीचे. तिचा फोटो पाहूनच तो वेडा झाला होता. ‘ही फोट मध्ये दिसते तशीच असेल तर लगेच लग्न करेन’, हे त्याने मनाशी पक्के केले होते. इथे अनुराधाच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताची तयारी सुरू होती. नरेश कढून अनुराधाला होकार मिळावा यासाठी तिच्या आईने…