मी नेहमी आनंदी असते कारण..
ऑफिसमध्ये वर्षभरापर्वीच रुजू झालेल्या हसतमुख नीराजला पाहून सर्वांना प्रश्न पडत असे, ही नेहमी आनंदी कशी असते.एकदा टी ब्रेकमध्ये,घरच्या कटकटीने त्रस्त झालेल्या तिच्या सहकर्मचारीने तिला म्हटलं,”तुझा हेवा वाटतो मला,माझं आयुष्यसुध्दा तुझ्यासारखे असावे असं वाटत.”त्यावर नीरज पटकन म्हणाली,”असं नको म्हणू,माझ्यासारखं आयुष्य देव कोणालाच देऊ नये.लग्नानंतर दोन वर्षांनी मला गर्भपिशवीचा कॅन्सर झाला.मला वाचविण्यासाठी गर्भपिशवी काढणे हाच एक मार्ग…



