शिवाजी नाही… शिवाजी महाराज.
आजच्या Modernisation आणि Digitalisationच्या काळातही आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीची , इतिहाची माहिती असावी यासाठी सागर आणि अवनी सतत प्रयत्नशील असत.एकदा त्यांच्या घरी सागरचे मित्रमंडळी जेवणासाठी आले होते. छान गप्पांचा कार्यक्रम रंगला होता. मुले तिथेच एका कोपऱ्यात बसून खेळत होती. इतक्यात सागरचा एक मित्र समोरच्या भिंतीवर असलेल्या शिवरायांच्या फोटोला पाहून म्हणाला,”अरे सागर,शिवाजीचा हा फोटो छान आहे…
