वादळ – एक अनपेक्षित वळण.
सौम्या नोकरी निम्मित पहिल्यांदाच मुंबईत आली होती. या आधी मुंबईत येण्याचा प्रश्नच नव्हता. सार काही गावाकडे.. सगळे नातेवाईक गावाकडे.. शिक्षण सुध्दा तालुक्यात झालं. पाटलांची एकुलती एक लेक.. त्यातच तीन पिढ्यामध्ये पहिली मुलगी. त्यामुळे लाडाकोडात वाढलेली. जे जे मागेल ते तिला मिळालं. घरात एवढं शिकलेली ती पहिलीच. स्वतःच्या पायावर उभं राहायचं, स्वतःची ओळख निर्माण करायची यासाठी…
