गोष्ट आहे २२२० सालची.. म्हणजे आपल्या भविष्यातली.. इथून २०० वर्ष पुढची.
नैना आणि विहंग दोघे नवरा बायको. त्यांचा मुलगा चिनू म्हणजे चिन्मय आणि रोबोट जेनी असे चौकोनी मध्यम वर्गीय कुटुंब. आज सकाळी उठल्यापासूनच नैना विहंगवर खुप चिडली होती. विहंग रात्री झोपण्यापूर्वी जेनीला चार्ज करायचं विसरून गेला. त्यामुळे आज सर्व काम एकट्या नैनावर पडलं होतं.
नैना चिडून विहंगला म्हणाली, ” तुझं हे रोजच झालं आहे. कंटाळा आला आहे मला आता. तू विसरूच कसा शकतोस जेनीला चार्जिंगला लावायला… मी एकटी काय काय करू? ऑफिसच काम, घरातलं काम, चिनूच्या डॉक्टर्सच्या appointments, .. ”
विहंग म्हणाला,” नैना एवढं बोलण्यासारखं काहीही झालेलं नाही आहे. आणि मी काय असं विसरलो गं? काल पहिल्यांदा विसरलो ना.. त्यावर एवढं का बोलते आहेस? एवढं का चिडते आहेस? दिवसाची सुरुवातच खराब झाली आहे आज.. ”
नैना म्हणाली ,” या आठवड्यात पहिल्यांदा विसरला आहेस तू असं म्हणायचं आहे का तुला?.. स्वतःच्या चुका सुध्दा स्वीकारत नाहीस तू. किती वेळा सांगितलं आहे मी नवीन रोबोट घेऊ. किती Advance रोबोट आले आहेत मार्केट मधे. चार्जिंगची गरज नाही. आणि आपण हा बाबा आजमच्या जमण्यातला रोबोट वापरत आहोत. किती वर्ष झाली जेनीला, पण तुला वेळ असेल तर ना माझ्या सोबत यायला.. आणि तुझं काय रे जातं.. तुला थोडीच घरची कामं करावी लागतात… आणि जर तुला हे काम लक्षात राहत नाही तर मग कामाचं वाटप केलं होतं तेव्हा तू हे काम का निवडलं.?.. मी माझी कामं पण करायची आणि मग तुझ्या वाटणीची कामं पण करायची. हेच करू का दिवस भर?.. आता हेच बघ ना ऑक्सिजन सिलिंडर संपायला आला आहे.. तुला सांगितल होतं त्या डिलरला फोन कर आणि मागावं.. तेही जमलं नाही तुझ्याने.. चिनूच्या डॉक्टर्स visit मी बघते.. तुला त्यातलं काही करावं लागत नाही.. immunity booster डोस द्यायला दर आठवड्याला जावं लागतं मला त्याला घेऊन. त्यात या एवढ्या लहान वयात त्याला diabetes..त्याचा एक वेगळा व्याप. सांग कसं करू हे मी एकटी …?”
तिच्या या प्रश्नांवर काही उत्तर नव्हतं विहंग कडे. त्याला आधीच निघायला उशीर झाला होता.. त्यामुळे वाद पुढे वाढवायच्या मनस्थितीत नव्हता तो. इतक्यात चिनू तयार होऊन आला.. नैनाने त्याची protective shield एकदा तपासून पाहिली.. त्याला face shield दिली. मास्क, ऑक्सिजन सिलिंडर , लॅपटॉप त्याला दिले.. वेळेवर औषध घे म्हणून बजावलं.. नेहमी प्रमाणे चिनू घरचा डब्बा न घेताच निघून गेला.. कॅन्टीन मध्ये पिझ्झा खाण्यासाठी विहंग ने त्याला पैसे दिले होते.. त्यामुळे आधीच चिडलेली नैना अजुन वैतागली.. तिलाही उशीर झालाच होता..त्यामुळे मला ऑफिसला सोड असे ती विहंगला म्हणाली..
विहंगने अलेक्साला विचारले.. ,”अलेक्सा आज ट्रॅफिक कुठे आहे ते मला सांग..”
अलेक्सा म्हणाली..,” मला काही क्षण द्या .. मी तुम्हाला त्वरित ही माहिती उपलबध करून देते.. दोन मिनिटांनी अलेक्साने स्क्रीन वर आकाशातले तसेच जमिनी वरचे असे दोन्ही ट्रॅफिक update विहंगला दिले.. आणि म्हणाली..,” सध्यातरी आकाशात ट्रॅफिक दिसत नाही आहे. पण मी suggest करेन तुम्ही जमिनी वरूनच जावे कारण येत्या १० मिनिटात आकाशात ट्रॅफिक वाढण्याची शक्यता आहे.. आणि तुम्ही दोघे ही १० मिनिटात घरातून निघाल असं मला वाटत नाही.. धन्यवाद.. तुमचा दिवस शुभ राहो..”
शेवटी विहंगने जमिनीवरून चालणारी त्याची कार रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने बाहेर काढली.. आणि दोघे निघाले..नैना अजूनही चिडलेली होती..
काहीतरी वेगळं विषय काढवा यासाठी विहंग म्हणाला..,” या दिवाळीत आपण two in one car घ्यायचा विचार करतोय मी.. म्हणजे जमिनीवर आणि आकाशात दोन्ही कडे तिचा वापर होईल. असे पण आता पार्किंगचे issue होत आहेत. Two in one असेल तर बरं पडेल आपल्याला..”
त्यावर नैना म्हणाली,” मला आधी Advance Robot हवा आहे.. मग तुला जे घ्यायचं आहे ते घे..”
विहंगने नैनाला ऑफिसला सोडलं.. आणि मग तो ऑफिसला गेला.. दुपारी ऑफिस मध्ये त्याच्या एका सहकाऱ्याला फोन आला.. त्याचा ८ वर्षांचा मुलगा हार्ट अटॅकने गेला.. सगळेच त्या सहकाऱ्याला सावरत होते. मग त्याला शांत करून दोघे जण त्याला सोडायला त्याच्या घरी गेले.. हे सर्व पाहून विहंगला चिनूची आठवण आली. आणि त्याला भीती वाटली.. नैनाच सुध्दा असंच काहीस होत असेल चिनू चा विचार करून हे त्याला जाणवलं.. चिनुच सर्व काही नैनाच एकट्याने बघते. कित्येक वेळेला कामामुळे त्याला दोन दोन दिवस घरी सुध्दा जाता येत नाही. आज घरी गेल्यावर नैनाला सॉरी बोलायचं आणि तिच्याशी वेळ काढून गप्पा मारायच्या असं त्याचं ठरलं.. घरी आल्यावर जेवण उरकल्यावर ते दोघं ही चिनूला झोपवून बेडरूम मध्ये गेले.. नैना अजूनही रागावलेली होती..
विहंग म्हणाला,” सॉरी डिअर, प्लीज आता अशी रागावू नकोस ना.. बघ आज मी जेनीला चार्जिंगला सुध्दा लाऊन आलो आहे.. आणि हो या वीकेंडला जाऊन आपण नवीन रोबोट घेऊ.. आता तरी बोल माझ्याशी.. रुसवा सोड आता.. “
नैना म्हणाली, ” ठीक आहे रे.. मी पण सकाळी थोड ओव्हर रिअँक्ट केलं.. आई अम सॉरी.. “
विहंग म्हणाला, ” मला माहित आहे तू चिनूमुळे टेन्शन मध्ये असतेस हल्ली. त्यात मी सुध्दा नसतो बरेचदा घरी. तुला एकटीलाच बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात.” हे बोलून त्याने आज ऑफिस मध्ये घडलेला प्रकार तिला सांगितल.
नैना म्हणाली,” हो रे मला फार भीती वाटते.. तो अवघा १० वर्षांचा आहे पण त्याच वजन ६० किलो झालं आहे. त्याला चालायला ही त्रास होती.. त्याला diabetes. त्याला काही झालं तर ही भीती सतत असते. डॉक्टर म्हणतात की त्याला खेळायला लावा. त्याचं डाएट सुधारा. अरे पण कुठे जाईल तो खेळायला.. इथे मैदान नाही. कुठे मोकळी जागा नाही.. तो नेहमी त्याच्या लॅपटॉप सोबत असतो.. खेळायचा त्याला प्रचंड कंटाळा येतो.. घरात ट्रेडमिल वर वॉक कर म्हटलं तर तेही करत नाही तो. काहीच फिजिकल activities नाही..मी प्रयत्न करते त्याने हेल्दी गोष्टी खाव्यात. पण सर्व गोष्टी आर्टिफिशियली तयार केलेल्या आहेत. कस पोषण मिळणारा त्याला. त्यात त्याला बाहेरच खायला जरा जास्तच आवडत. असं कसं चालेल..”
विहंग त्यावर म्हणाला, ” तो तरी काय करेल बिचारा.. त्याच्या सोबत खेळणार कोणी तरी हवं ना. त्याच्या वयाच्या प्रत्येक मुलाची हीच अवस्था आहे. कोणीच मैदानी खेळ खेळत नाही.. आपणच नशीबवान होतो. निदान थोडी तरी मैदानं होती आपल्या वेळेला. तुला माहित आहे माझी आजी सांगायची तिच्या आजीचे किस्से.
नैना म्हणाली , ” म्हणजे तुझ्या पणजीचे किस्से”
विहंग म्हणाला,” पणजी नाही गं खापर पणजी may be. असो तर ऐक ना.. तेव्हा ना हे असं ऑक्सिजन सिलिंडर विकत आणावे नाही लागायचे.. हिरवी झाडे झुडपे असायची तेव्हा.. आता आपण फोटोज् मध्ये बघतो ना ते सर्व रिअल मध्ये होतं.. ते ऑक्सिजन generate करायचे.. एवढ्या protective shield सुध्दा लागायच्या नाहीत तेव्हा.. ओझोनचा लेयर होता एक, त्यामुने सूर्य किरण डायरेक्ट पृथ्वीवर यायची नाहीत.. हार्ट अटॅकच प्रमाण पण वयस्कर लोकांमध्ये जास्त होत..आजारपण खुप कमी होती.. तेव्हा ना फक्त जमिनीवर कार चालायची.. आकाशात फक्त विमान उडायचे. पक्षी सुध्दा होते तेव्हा. ते सुध्दा आकाशात मस्त संचार करायचे. पुढे पुढे माणूस प्रगती करत गेला आणि निसर्गाची हानी करत गेला.. निसर्गाने वेग वेगळ्या माध्यमातून खुप वेळा चेतावणी दिली होती लोकांना पण त्या वेळचे लोक हे सर्व ऐकायलाच तयार नव्हते.. एक न्यू लाइफ स्टाइल, advance version, technology या सर्वांच्या पाठी एवढे वेडे झाले की आता आपल्यावर ही वेळ आली आहे …
नैना म्हणाली,” मग तुझं काय मत आहे माणसाने प्रगती करू नये का?
विहंग म्हणाला,” अगं असं कसं म्हणेन मी. प्रगती केलीच पाहिजे.. त्याशिवाय आपण जगणार कसे.. काळा सोबत चालायला हवं.. पण बघ ना developement च्या नावाखाली किती ईमारती उभ्या रहल्या आहेत.. आता कुठे आहेत झाडं? मैदान? नद्या? त्यामुळे मोकळी हवा नाही. मैदान नाही मग मुल खेळू शकत नाही.. स्वच्छ पाणी नाही, आजारपण पण किती आहेत बघ ना.. मी मानतो आता औषध सुध्दा आहेत तेवढीच.. पण आता दर आठवड्याला जे immunity booster डोस देतेस ना चिनू ला ते द्यायची वेळच आली नसती आपल्यावर.. खुप गोष्टी आहेत गं अशा ज्या आज वेगळ्या असतात.. आपल्या पूर्वजांनी जर भूतकाळात काही चुका केल्या नसत्या ना तर आज आपण एक वेगळी लाईफ जगात असतो.. आपलं जे काही आहे ते वाईट आहे असं नाही म्हणणार मी. पण सुख समाधान नक्की काय असतं ना ते मुळात अजुन आपण पाहिलेच नाही.. अनुभवलेले नाही.. “
नैना म्हणाली,” तुझ बोलण ऐकुन मला असं वाटू लागलं आहे जर खरंच भूतकाळात जाऊन ह्या चुका दुरुस्त करता आल्या तर. किती बरं होईल ना.. “
विहंग म्हणाला, “आता ते शक्य नाही.. “
मी भविष्य आहे.. या पृथ्वी तलावरच्या सर्व सविजांच भविष्य.. हा फक्त एक प्रसंग होता.. अशा कित्येक घटना येथे घडत असतात.. आज ही पृथ्वी फार वेगळी आहे.. समुद्र खुप घाण झाला आहे.. नद्या तर अगदी बोटावर मोजण्या इतक्याच उरल्या आहेत. झाडे तर अस्तित्वातच नाहीत, कुठे मोकळी जागा नाही. हवा दूषित आहे. माणूस असाच घराबाहेर पडू शकत नाही , त्याला त्याच कवच घालूनच निघाव लागतं. सगळी कडे झगमगाट आहे. पण निसर्ग कुठेच नाही. माणसाने प्रगती केली आहे.. पण खरं जगणं काय असते ते तो विसरला आहे.. प्रत्येक क्षण तो आपल्या पूर्वजांना कोसातो. भूतकाळात त्यांनी केलेल्या चुकांमुळे आज तो या अवस्थेत आहे असे म्हणतो. प्रगती पथावर चालताना त्यांनी बाकीच्या गोष्टींचा सुध्दा थोडा विचार केला असता तर आज तो अधिक सुखी असता असं त्याला वाटत.. असो आता मी तरी काय करू शकतो .. मी फक्त मला जे दिसतं तेच सांगू शकतो.. आजही वेळ आहे तुमच्या कडे. तुमचा वर्तमान तुमच्या नवीन पिढीचा भूतकाळ असेल. हा भूतकाळ त्यांना कटू नको वाटायला. सतत ‘ आमचा भूतकाळ बदलता आला असता तर ‘ हे विचार त्यांच्या मनात नको यायला., या भूतकाळच्या आठवणी, पूर्वजांच्या आठवणींचा त्यांना आदर असला पाहिजे, असे जर वाटतं असेल तर काय तो विचार करा आणि तशी ठोस पावले उचला.
वाचकहो हा लेख पूर्णपणे काल्पनिक आहे हे तर एव्हाना तुम्हाला कळलंच असेल.. माझ्या कल्पना शक्तीच्या जोरावर मला जेवढं सुचलं ते मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अजुन असे बरेच मुद्दे असतील जे मला मांडता आले नाही.. पण भविष्यात थोड्या फार प्रमाणात परिस्तिथी अशीच असेल. माणूस वर्तमानात जगतो, भविष्यचा विचार करत जगतो.. पण त्याने भूतकाळात केलेल्या चांगल्या वाईट गोष्टींचा परिणाम त्याच्या वर्तमान आणि भविष्यावर होतो. खरंच पुढे जाऊन आपल्या पुढच्या पिढीने आपल्याला दुशन लावू नये, त्यांचे आयुष्य सुखा समाधानाचे असावे, त्यांच्यासाठी आपण प्रगत तंत्रज्ञान सोबतच चांगला निसर्ग आणि जगण्यासाठी उपयुक्त असे वातावरण जपून ठेवले पाहिजे असे मला वाटते.. माझे हेच विचार मांडण्याचा मी एक छोटाचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला काय वाटते ते जरूर कळवा..
* समाप्त *
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.



वाह! अतिशय अप्रतिम शब्दकळेत, कल्पनाशक्तीचा योग्य वापर करून आपण सुयोग्य विचार मांडला आहे…👌👌👌 खरंच आपल्याला ह्याकडे लक्ष द्यायला हवा नाहीतर भविष्यात असंच होईल…!! डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख..👏🔥🤟👍