Home » Marathi » 100 Words Stories » हत्ती गेला अन्…( माझी प्रेन्गंसी )

हत्ती गेला अन्…( माझी प्रेन्गंसी )

प्रेन्गंसीचे पाच महिने मी अगदी उलट्या करत काढले. सहाव्या महिन्यापासून थोडी स्थिरावले. नववा महिना लागताच पुन्हा उलट्या सुरू झाल्या. पण या वेळेला वाढलेल्या गर्भासोबत उलट्या माझ्यासाठी अगदी जीवघेण्या झाल्या होत्या. दुसरे त्रासही होतेच. बसणं,चालणं, झोपणं सगळच कठीण होऊन बसलं होत मला.

माझी EDD१९ डिसेंबर होती. १६ डिसेंबरला चेकअपसाठी आम्ही डॉक्टरकडे गेलो. मला तपासून झाल्यावर डॉक्टर म्हणाल्या,”बाळ अगदी मजेत आहे आत. सर्व योग्य असेल तर आपण अजून २आठवडेही थांबू शकतो “. हे ऐकताच माझा चेहरा रडवेला झाला. मी डॉक्टरांना म्हणाले,”नको प्लिज अजून नाही होणार माझ्याने. माझी रिअँक्शन बघून डॉक्टर हसून म्हणाल्या,”अहो अस काय करता,हत्ती गेला आता फक्त शेपूट राहील आहे.”

माझ्या बाळाला कदाचित माझी अवस्था बघवली नाही आणि तो १७ डिसेंबरलाच या जगात आला.

डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *