Home » Marathi » 100 Words Stories » ओल्ड इज गोल्ड.. क्रिकेट प्रेम

ओल्ड इज गोल्ड.. क्रिकेट प्रेम

भारतात क्रिकेट आणि क्रिकेटर्सच एक वेगळाच स्थान आहे. शाळेत असल्यापासूनच मला क्रिकेट बघण्यासोबतच खेळायची खुप हौस. महिला क्रिकेट संघाच्या पूर्व कॅप्टन अंजली पेंढारकर यांच्याकडून कोचिंग सुध्दा घेतली. जेवढ शक्य झालं तेवढं मनसोक्त खेळले देखील. काळानुसार क्रिकेटमध्ये भरपूर बदल झाले. नवोदित खेळाडू उदयास आले. पण आम्हा नव्वदच्या दशकात जन्माला आलेल्या पिढीला आजही ती जुनी भारतीय क्रिकेट टीम अधिक प्रिय आहे. सचिन, राहुल, सौरभ, लक्ष्मण, सेहवाग, झहीर, नेहरा, कुंबळे, हरभजन, युवराज, कैफ हे सगळे खेळाडू म्हणजे तेव्हा देवदूतच भासायचे.

आज टीम इंडियामध्ये बरेच स्टार खेळाडू आहेत. पण टीम इंडियाला क्रिकेट विश्वात स्टार बनवणारे आणि इतर सर्व देशांना टीम इंडियाची दखल घ्यायला भाग पाडणारे हे खेळाडू आजही क्रिकेट प्रेमीच्या मनात घर करून आहेत.

डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *