यामिनी आजही अशोकशी भांडत होती. ” कुठे नशीब फुटलं, तुमच्यासारख्या पोलिसाशी लग्न केलं मी. ना सणवार, सुखदुख. माझं सोडा पण निदान आज मुलाच्या वाढदिवसादिवशी तरी वेळेत यायचं घरी. माझ्या नशिबी हेच आहे हे मान्य केलं आहे मी,पण मुलाचा तरी विचार करायचा.”
अशोक आजही शांतपणे तिला सॉरीच म्हणाला.
छोटा अमोघ सर्व ऐकत होता. तो धावतच यामिनिकडे गेला आणि तिला बिलगून म्हणाला,”आई बाबांना ओरडू नकोस ना.आमच्या बाई सांगतात बाबांसारखे पोलिस आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. ते त्यांचं काम मन लावुन करतात म्हणून आपण मोकळेपणाने मज्जा करतो. मला त्यांचा खुप अभिमान आहे.”
आपल्या लेकराला हे कळलं पण आपण समजून घेत नाही,नशिबानेच तर असा कर्तृत्ववान नवरा मिळाला आहे याची यामिनीला जाणीव झाली.
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.


