प्रत्येक कुटुंबात असते एक बायको. नवऱ्यावर खूप प्रेम करणारी. सतत त्याच्या दीर्घायुष्यासाठी उपासतापास करणारी. तुझ माझ्यावर प्रेमच नाही अशी तक्रार करणारी. छोट्या गोष्टींवरून रुसून बसणारी. संध्याकाळी त्याच्या वाटेवर डोळे लावून बसणारी. मला माहेरची आठवण येते असे सतत सांगणारी पण सासरी पूर्णपणे रमणारी. वाद घालणारी, दुसऱ्याच क्षणी त्याच्या मिठीत विसावणारी. त्याच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे उभी राहणारी. त्याला चूक बरोबर काय ते स्पष्टपणे सांगणारी. त्याच्या मानापमानची दखल घेणारी.
प्रत्येक कुटुंबात असतो एक नवरा. बायकोवर असीम प्रेम करणारा पण कधीही तिला व्यक्त न करू शकणारा. तिच्या रुसण्यावर हळूच हसणारा. तिच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारा. तिच्या वादांवर गप्प बसून प्रतिसाद देणारा. तूच बरोबर आहेस असे नेहमी म्हणणारा. तिच्या शांततेतल दुःख समजून घेणारा. तिचा मान सर्व ठिकाणी जपणारा. तिच्या डोळ्यात स्वतः चे अस्तित्व शोधणारा.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


