स्वप्न पाहताना सारं किती छान वाटतं, पण ती तुटल्यावर आजुबाजूच जग भयाण वाटतं. दिवसाढवळ्या स्वप्नात रमल्यावर बरेचदा सत्याचा विसर पडतो, स्वप्न आणि सत्य यांचीच आपण गफलत करत असतो. स्वप्नात आपण आपलं भविष्य शोधायचा प्रयत्न करत असतो, पण आज आपण वर्तमानात जगतोय याचाच आपल्याला विसर पडलेला असतो. स्वप्न जरूर पाहावी, सोबतच ती पूर्ण करण्याची जिद्द उराशी बाळगावी. भविष्यात रमताना वर्तमानाशी सुध्दा मैत्री करावी. सारी स्वप्न पूर्ण होतीलच अशी अट नसावी, पण प्रयत्नांमध्ये कुठेही कमी नसावी.
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.


