समीर आणि नेहाचे भांडण झाले. नेहा माहेरी गेली. नेहा रुसल्यावर तिची नेहमी समजूत काढणारा समीर आज रागावला होता. त्यामुळे त्यानेही या वेळी फोन न करण्याचा निर्णय घेतला. तिथे नेहा समीरच्या फोनची वाट पाहत होती. नेहाला अस्वस्थ वाटत होते म्हणून ती डॉक्टरकडे गेली. तिथे गेल्यावर कळले ती आई होणार आहे. तिने तडक घरी जायचे ठरविले.समीर घरी आला तेव्हा नेहाला पाहून त्याला आनंदच झाला,पण अजूनही तो रागावलेला होता. तो फ्रेश व्हायला गेला तेव्हा नेहाने त्याच्या स्टडी टेबलवर तू बाबा होणार आहेस असे लिहिलेली चिठ्ठी ठेवली. समीरने ती चिठ्ठी वाचली. त्याला आकाश ठेंगणे झाले होते. तो धावतच नेहाकडे गेला. आनंदाने नाचू लागला. त्याच्या डोळ्यांचे काठ पाण्याने भरले होते. त्याला तसे पाहून नेहाचेही डोळे पाणावले होते.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


