Home » Marathi » 100 Words Stories » अनोळखी.. जुन्या प्रेमाची नवीन सुरुवात

अनोळखी.. जुन्या प्रेमाची नवीन सुरुवात

तिने आज सात दिवसांनंतर डोळे उघडले होते. तो समोरच होता तिच्या. पण तो अनोळखी असल्यासारखी ती त्याला बघत होती. तो तिच्या जवळ गेला आणि तिने ओरडायला सुरुवात केली. त्याला काही कळायच्या आत डॉक्टर तिथे आले आणि त्यांनी त्याला बाहेर जायला सांगितले.
डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी त्याला सांगितले, तिचा स्मृतीभ्रंश झाला आहे. हे ऐकुन त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ‘त्यांच्या गाडीला अपघात झाला होता, सुदैवने दोघं बचावले होते’, हे डॉक्टर्सनी तिला ती स्टेबल झाल्यावर सांगितले. त्याची ओळख करून दिली. पण तिला आता त्यातले काहीच आठवत नव्हते.
तो हार मानणारा नव्हता. तिच्यासाठी आता तो अनोळखी जरी असला तरी तो सज्ज झाला होता पुन्हा एकदा तिला त्याच्या प्रेमात पाडायला,जुन्या प्रेमाची नवीन सुरुवात करायला.

डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *