२६ जुलै२००५ आजही त्या दिवसाच्या आठवणी ताज्या आहेत.मी तेव्हा पंधरा वर्षांची होते.माझ्या आयुष्यात मी पाहिलेली पहिली पूरपरिस्थिती.आभाळ फटल्यासारखा पाऊस कोसळत होता. मुंबापुरीची तुंबापुरी झाली होती.पहिल्यांदाच मुंबई थांबली होती. लोक जागोजागी अडकून पडले होते.प्रत्येकाला घर गाठायचे होते, पण बऱ्याच जणांना त्या रात्री ते शक्य झाले नाही.
माणुसकी म्हणजे नक्की काय हे तो पर्यंत मूल्यशिक्षणात शिकले होते पण त्या दिवशी जवळून अनुभवले.सर्व जाती धर्माचे,गरीब,श्रीमंत लोकं एकमेकांना मदत करत होते. कोणी अन्न पुरवीत होत,कोणी पाणी. कोणी पाण्यातून वाट काढत रस्ता दाखवीत होत.तर रस्त्यात अडकलेल्या लोकांना कोणी आसरा देत होत.एकमेकांसाठी पूर्णपणे अनोळखी असणारे लोकं एका कुटुंबाचा भाग असल्यासारखेच वागत होते.एकमेकांना आधार देत होते.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


