दरवर्षी माणूस पुतळा रुपी रावणाचे माणूस दहन करतो पण त्याच्या अंतरी असलेला रावण मात्र त्याच्यावर हसतो.
अरे माणसा.. तुझ्यात लपला आहे रावण, त्याला कोण मारणार?
रोज कानावर बातमी येते स्त्री भ्रूण हत्येची, अत्याचाराची, बलात्काराची… तिचे लचके कुठवर तोडणार..?
हे असे कधी पर्यंत चालणार..?
प्रत्येक युगात तिला द्यावी लागली आहे अग्नी परीक्षा.. हा समाज तिला चरित्र हिन कुठवर ठरवणार ..?
हे असे कधी पर्यंत चालणार..?
बदल घडवायचा असेल तर सुरूवात स्वतः पासून करावी लागते, हे कधी आपल्याला उमजणार..?
पुतळ्यातला रावण तर दरवर्षी दसऱ्याला जाळला जातो पण आपल्यातला रावण कधी मरणार..?
हे असे कधी पर्यंत चालणार..?
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

