अक्कण माती चिक्कण मातीमाझी सासूबाई सुरेख गं,त्यांचे गोडवे किती गाऊ गं.
माझी नणंद बाई सुरेख गं,तिचे कौतुक किती करू गं.
माझे सासरे बुवा सुरेख गं,त्यांची स्तुती किती करू गं.
माझे नवरोजी सुरेख गं,इश्श.. त्यांचे माझ्यावर खूप खुप प्रेम, त्यांचे किस्से किती सांगू गं.
माझे सासर आहे सुरेख गं,किती गोष्टी सांगू गं.
माझे माहेर आहे सुरेख गं,पण सासरी रमले मी, आता माहेरच्या आठवणींनी नाही येत डोळा पाणी गं.
ईडा पीडा टळो, दुष्टांची नजर न लागो, माझी दोन्ही घर सदैव हसरी राहतो हीच मनी इच्छा गं.
अक्कण माती चिक्कण माती, लाभले मला सासर सुरेख गं.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


