Home » Marathi » Informative » ६ मिनिट्स वॉक टेस्ट.

६ मिनिट्स वॉक टेस्ट.

नजीकच्या काळात रक्तातील ऑक्सिजन पातळी ( blood oxygen saturation level) , पल्स ऑक्सिमीटर असे काही शब्द आपण ऐकले आहे. कोरोना मुळे आता ऑक्सिजन पातळी सतत तपासत राहणं खुप गरजेचं आहे हे असा सल्ला हल्ली सर्वच डॉक्टराकडून मिळतो.
६ मिनिट्स वॉक टेस्ट ही एक अशीच टेस्ट आहे जी केल्याने आपल्याला आपल्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची योग्य माहिती मिळते. तसेच घराच्या घरी आपल्या फुफुसांच्या आणि हृदयाच्या आरोग्याची माहिती मिळते.का करावी?

• का करावी?
✓ कोरोनाच्या संसर्गाच्या काळात फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का हे तपासून पाहण्यासाठी.

• चाचणी कोणी करावी?
✓ होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांनी.
✓ ज्यांना कोरोनासारखी लक्षणे आहेत ( ताप, सर्दी, खोकला..).
✓ ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत आणि rt pcr चाचणीच्या रिपोर्टच्या प्रतीक्षेत आहेत.

• चाचणी कोणी करू नये?
✓ ज्यांना बसल्या जागीच खुप दम लागतो.
✓ ज्यांची ऑक्सिजन पातळी ९३ वा त्याच्या खाली आहे.

• आवश्यक साहित्य
✓ स्टॉप वॉच ( यासाठी मोबाईलचा वापर करू शकतो)
✓ पल्स ऑक्सिमीटर

चाचणी कुठे करावी?
✓ ही चाचणी घरातल्या घरात करता येते.
✓ घरात कडक पृष्ठभाग असलेल्या आणि जास्तीत जास्त मोकळी जागा असलेल्या ठिकाणी ही चाचणी करावी.
✓ चाचणीसाठी निवडलेल्या मार्गात वळणे तसेच उंच सखल भाग असू नयेत.
✓ पायऱ्यांवर ही चाचणी करता येणार नाही.

• चाचणी कशी करावी?
✓ चाचणी पूर्वी व्यक्तीने किमान १० मिनिटे एका जागी शांत बसावे.
✓ नंतर पल्स ऑक्सिमीटरने ऑक्सिजन पातळीची नोंद करावी.
✓ पल्स ऑक्सिमीटर तसेच बोटाला ठेऊन मध्यम गतीने चालायला सुरुवात करावी.
✓ सहा मिनिटे चालून झाल्यावर ऑक्सिजन पातळीची नोंद करावी.

• चाचणी करत असताना काय दक्षता घ्यावी?
✓ चाचणी सुरू असताना जर त्या व्यक्तीला खुप घाम येऊ लागला,दम लागू लागला, चक्कर येऊ लागली, किंवा यापैकी एकही चिन्ह आढळून आले तर ही चाचणी त्वरित थांबवावी. तज्ञ डॉक्टरांना संपर्क साधावा.

• चाचणीतून काय कळते?
✓ सहा मिनिटे चालून झाल्यावरही जर ऑक्सिजनची पातळी कमी होत नसेल तर आरोग्य उत्तम आहे.
✓ जर ऑक्सिजनची पातळी १ ते २ टक्क्यांनी कमी होत असेल तर काळजी न करता थोड्या वेळाने पुन्हा ( साधारण २ तासांनी) चाचणी करून पाहावी जेणेकरून ऑक्सिजनच्या पातळी मध्ये नक्की बदल होतो आहे का हे कळेल. ( पहिले रिडिंग आणि दुसरे रिडिंग यामधला फरक बघावा.)
✓ जर ऑक्सिजनची पातळी ३ टक्क्यांनी कमी होत असेल तर त्वरित तज्ञ डॉक्टरांना संपर्क करावा.( दुसऱ्यांदा तपासून पाहायची गरज नाही.)
✓ जर ऑक्सिजनची पातळी ९३ वा त्याहून खाली आली असेल तर त्वरित तज्ञ डॉक्टरांना संपर्क करावा. अशा व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते. ( दुसऱ्यांदा तपासून पाहायची गरज नाही.)

★ ६० वर्षांवरील व्यक्तींनी ६ मिनिटच्या ऐवजी ३ मिनिट वॉक टेस्ट केली तरी चालेल.

डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *