कोरोनाची सौम्या लक्षणे, कोरोनातून बरे झाल्यानंतर तसेच श्वसन संस्था , हृदय या संबंधी आजार असल्यास बरेचदा दैनंदिन जीवनातील छोटीमोठी कामे करतानाही दम लागण्याच्या समस्येला काही जणांना सामोरे जावे लागते.
अशी समस्या उद्भवल्यास पुढील गोष्टी कराव्यात..
१ – खुर्ची अथवा सोफ्यावर बसून थोडे पुढे झुकावे. हात मांडीवर ठेवावे.

२ – खुर्ची , टेबल असल्यास खुर्चीवर बसून टेबलावर उशी ठेवून (आपल्या उंचीनुसार) उशीवर डोके ठेवावे. मान उजव्या किंवा डाव्या बाजूला वळवावी. दोन्ही हात उशीच्या बाजूला ठेवावे.

३ – खुर्चीवर पूर्णपणे टेकून ताठ बसावे. हात मांडीवर ठेवावे.

४ – उभे राहताना थोड झुकून उभे राहावे. जवळपास स्वतःचा उंचीला योग्य असेल अशा गोष्टींचा आधार घ्यावा. उदा. खुर्ची, कठडा.

५ – भिंतीला चिकटून उभे राहावे. पाठ आणि कंबरेला भिंतीचा आधार देऊन उभे राहावे. खांदे आणि मान थोडी झुकवावी.

६ – एका कुशीवर वळून झोपावे. साधारण ४ ते ५ उशांचा आधार घ्यावा. (साधारण ४५° अँगल असला पाहिजे).

•दम लागत असल्यास ह्या काही positions मध्ये काही प्रमाणात आराम मिळतो.
•असे करूनही आराम मिळत नसल्यास तज्ञ डॉक्टरांना संपर्क करावा.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


