Poem

बायको आणि नवरा #acrossthebridge

प्रत्येक कुटुंबात असते एक बायको. नवऱ्यावर खूप प्रेम करणारी. सतत त्याच्या दीर्घायुष्यासाठी उपासतापास करणारी. तुझ माझ्यावर प्रेमच नाही अशी तक्रार करणारी. छोट्या गोष्टींवरून रुसून बसणारी. संध्याकाळी त्याच्या वाटेवर डोळे लावून बसणारी. मला माहेरची आठवण येते असे सतत सांगणारी पण सासरी पूर्णपणे रमणारी. वाद घालणारी, दुसऱ्याच क्षणी त्याच्या मिठीत विसावणारी. त्याच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे उभी राहणारी….

Poem

आजी

आता ती थोडी बदलली आहे.आजही ती संस्कार, परंपरा, मूल्य यांचं शिक्षण देते,पण आता तिची स्मार्ट फोन शी गट्टी जमली आहे.आजही तिच्या प्रेमळ कुशीत मायेची ऊब मिळते,पण आता तिने नऊवरी बरीच मागे सोडली आहे. डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

Poem

आठवणीतला पाऊस..

आज पावसात भिजताना फार एकटं वाटतं होत.जुन्या आठवणींच सावट पुन्हा एकदा मनात दाटल होत.आजचा पाऊस अगदी आगंतुक पाहुण्यासारख आला, आणि माझ्या हृदयात कधीकाळी शिरकाव करणाऱ्या त्या आगंतुक पाहुण्याची मला आठवण करून गेला. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Poem

आजी

आता ती थोडी बदलली आहे.आजही ती संस्कार, परंपरा, मूल्य यांचं शिक्षण देते,पण आता तिची स्मार्ट फोन शी गट्टी जमली आहे.आजही तिच्या प्रेमळ कुशीत मायेची ऊब मिळते,पण आता तिने नऊवरी बरीच मागे सोडली आहे. डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

Poem

आजी

कुटुंबात असावी आजी. नातवंडांना शंभो घालणारी. चिऊ काऊचे घास भरवणारी. आपले बालपण पुन्हा जगणारी. स्वतः च्या मुलांचे जेवढे हट्ट पुरवले नाहीत तेवढे नातवंडांचे पुरवणारी. त्याचे खूप खूप लाड करणारी. नातवंडांना छान छान गोष्टी सांगणारी. भातुकलीच्या खेळात रमणारी. आई बाबाच्या मारा पासून वाचवणारी. भुर नेणारी. बालगीत, प्रार्थना शिकवणारी. कुटुंबात असावी एक आजी घराला घरपण देणारी. डॉ….

100 Words Stories

कायापालट.. एक नवीन सुरुवात.

अनामिका..आज स्वतःला संपवायचे या विचारानेच घराबाहेर पडली होती. नुकतंच शिक्षण पूर्ण झालेली, दिसायला देखणी, लाघवी, हुशार, काहीतरी वेगळं करून दाखवेल असे सर्वांना जीच्याबद्दल वाटायचे अशी नेहा आणि आशिष यांची एकुलती एक लेक म्हणजे अनामिका. महिनाभरा पूर्वी प्रेमभंग झाला होता तिचा. ते सहन होते नव्हते तीच्याने. म्हणून आज स्वतः संपवायला निघाली होती.वाटेत तिची नजर एका अपंग…

Blogs

मदत

दुपारी साधारण अडीच-तीनच्या सुमारास दिवाणखान्यातून कसला तरी आवाज आला. मी स्वयंपाक घरातूनच डोकावून पाहिले. खिडकीबाहेर एक कबुतर अडकले होते. त्याला मदत करण्यासाठी मी बाहेर आले. खिडकीला बाहेरून जाळी असल्यामुळे मला आतून काही विशेष करताही येत नव्हते. त्या कबुतराला नक्की काय झाले आहे हे सुध्दा मला कळत नव्हते. तरी मी इथून आतून मला काही मदत करता…

Blogs

एक होता विदुर..

महाभारत म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो श्री कृष्ण,त्या पाठोपाठ पांडव,कौरव,कुंती,कर्ण,द्युत सभा,द्रौपदी, वस्त्रहरण,कुरुक्षेत्र… फारच क्वचित आणि अगदी फार कमी लोकांना विदुर या महाभारतातल्या पात्राची आठवण येते. खरतर मी सुध्दा या विदुराचा एवढा विचार या आधी कधीच केला नव्हता. पण लॉकडाऊनच्या काळात महाभारत पुन्हा एकदा पाहण्याचा योग आला. महाभारतातील पात्र तशी परिचयाचीच होती. कथा…

100 Words Stories

आयुष्यातले छोटे हसरे क्षण..

राघव जे असेल ते पटकन बोलणारा,तर जुई थोडीशी हळवी,मनातलं लगेच न सांगणारी.असेच एके दिवशी राघवचे ऑफिसमध्ये काहीतरी बिनसले.त्याच रागात तो घरी आला.जुईसुध्दा थोडी वैतागलेली होती.आधी ऑफिस,मग घरची कामं,मुलाचा पसारा,त्यातच सासूबाईंनी तिला जेवणावरून सुनावले होते.राघवने जुईला खुप वेळा विचारून सुध्दा ती काहीच सांगत नव्हती.शेवटी राघव वैतागला आणि तिच्यावर चिडला.जुई रडू लागली.ते पाहून तर त्याला अजून राग…

Blogs

पहिला घास

आजचा दिवस सुध्दा संपला. कधी पासून मी या दिवसाची वाट पाहत होते. आज बाळाला सहा महिने पूर्ण झाले. त्याचा अन्न प्राशन विधी झाला आज. काल पासूनच तयारी सुरू झाली होती.