100 Words Stories

शिवाजी नाही… शिवाजी महाराज.

आजच्या Modernisation आणि Digitalisationच्या काळातही आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीची , इतिहाची माहिती असावी यासाठी सागर आणि अवनी सतत प्रयत्नशील असत.एकदा त्यांच्या घरी सागरचे मित्रमंडळी जेवणासाठी आले होते. छान गप्पांचा कार्यक्रम रंगला होता. मुले तिथेच एका कोपऱ्यात बसून खेळत होती. इतक्यात सागरचा एक मित्र समोरच्या भिंतीवर असलेल्या शिवरायांच्या फोटोला पाहून म्हणाला,”अरे सागर,शिवाजीचा हा फोटो छान आहे…

100 Words Stories

ओल्ड इज गोल्ड.. क्रिकेट प्रेम

भारतात क्रिकेट आणि क्रिकेटर्सच एक वेगळाच स्थान आहे. शाळेत असल्यापासूनच मला क्रिकेट बघण्यासोबतच खेळायची खुप हौस. महिला क्रिकेट संघाच्या पूर्व कॅप्टन अंजली पेंढारकर यांच्याकडून कोचिंग सुध्दा घेतली. जेवढ शक्य झालं तेवढं मनसोक्त खेळले देखील. काळानुसार क्रिकेटमध्ये भरपूर बदल झाले. नवोदित खेळाडू उदयास आले. पण आम्हा नव्वदच्या दशकात जन्माला आलेल्या पिढीला आजही ती जुनी भारतीय क्रिकेट…

Informative

फिजिओथेरपी बद्दल बोलू काही…

फिजिओथेरपी म्हणजे भौतिक उपचार शास्त्र आणि फिजिओथेरपिस्ट म्हणजे भौतिक उपचार तज्ञ. तसे बरेचदा हे दोन्ही शब्द कानावर पडतात.. “माझी कंबर दुखते आहे म्हणून हाडांच्या डॉक्टरने मला फिजिओथेरपी ट्रीटमेंट घ्यायला सांगितली आहे. माझी मान दुखते आहे म्हणून मी शेक घ्यायला जाते, माझ्या गुडघ्याच्या ऑपरेशन नंतर ते पूर्ववत होण्यासाठी मी फिजिओथेरपीचे व्यायाम केले, अर्धांगवायूचा घटका आल्यानंतर मी…

Stories

एक शोकांतिका… भाग २

क्रमशः दुसरा दिवस उजाडला आणि सावंत कुटुंब निघाले . अबोलीच्या सासरी पोहोचले.. अबोलीच सासर म्हणजे आलिशान महाल. इथे आपल्या लेकीला काहीच दुःख नसेल. सुख तिच्या पायाशी लोळण घेत असेल. असाच विचार अण्णांच्या मनात आला. अमृतलाही असच सासर मिळो हीच आता एक इच्छा होती त्यांची… सावंत कुटुंबीय अचानक आलेले पाहून रमाकांत देवधर म्हणजे अबोलीचे सासरे थोडे…

Stories

एक शोकांतिका.. भाग १

शालिनी ताई बागेतून अगदी लगबगीने घरी आल्या. आल्या त्याच दामोदर अण्णांना शोधू लागल्या. अण्णा अंगणात रोपांना पाणी घालत होते. ताईंनी त्यांना हाक मारली. ” अहो ऐकलंत का.. कुठे आहात?” अण्णांनी अंगणातून आवाज दिला, ” अग इथे अंगणात ये, रोपांना पाणी घालतोय..” शालिनी ताई अगदी धावतच त्यांच्यापाशी गेल्या.अण्णा म्हणाले, ” शालू अग काय झालं.. एवढी धापा…

100 Words Stories

रात्रीच्या गर्भात…

त्या रात्रीच्या गर्भात काय दडले होते याची त्या दोघींना कल्पनासुद्धा नव्हती. त्या नराधमाने योग्य संधी साधून तिच्या लेकीची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. मुलीने मागचा पुढचा विचार न करता सूर्‍याने भोसकून त्याचा खून केला. आपल्या वासनापूर्तीसाठी अनैतिक संबंधांच्या आहारी गेलेल्या तिला आज चपराक बसली होती. तो तोच होता ज्याच्यासोबत मिळून तिने इतकी वर्ष आपल्या नवऱ्याला फसवले…

Quotes

नशीब

ज्यांचा स्वतः वर विश्वास नसतो ते नेहमी नशिबाला दोष देत राहतात. डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

100 Words Stories

ही वाट दूर जाते…

राखी आणि योगेश गोंडस मुलीचे आई बाबा झाले. आपल्या मुलीला आईबाबांच्या प्रेमासोबतच उत्तम संस्कार आणि शिक्षण मिळावे ही त्यांची इच्छा होती. मुलगी मोठी होत होती. तसतशी त्यांची चिंता वाढत होती. त्यांच्या बस्तीतलं वातावरण तिच्यासाठी योग्य नाही हे दोघानाही जाणवत होतं. बस्ती सोडून कुठेतरी चांगल्या ठिकाणी घर घेणे गरजेचे होते,” पण आपल्यासारखे हातावर पोट असणा-या माणसांना…

100 Words Stories

खरा दागिना..

सुमितला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळाली होती पण अर्धीच. अर्धी फी त्याला भरावी लागणार होती.” सर्व मेहेनत वाया गेली. अर्धी फी नाही भरू शकणार मी,”असे सुमित त्याच्या मित्राला सांगत असताना त्याच्या खोलीच्या दाराशी उभे असलेल्या आईने ऐकले. सुमित खुप हुषार, मेहनती, समजूतदार होता.आईने तिचे स्त्रीधन विकले. तरीही पैसे अपुरे पडत होते. मग आईने त्याच्या वडिलांची शेवटाची…

Quotes

संयम

कठीण दिवस ही निघून जातील,निरुत्तर प्रश्नांची उत्तरं जरूर मिळतील.संयमाने योग्य क्षणाची वाट पाहावी ,नशिबाची बंद कवाडे नक्की उघडतील. ********************************************************************************************************************* प्रतिकूल परिस्थितीत माणसाने दाखवलेला संयम त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवतो. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.