100 Words Stories

दवबिंदू

वॉकरच्या साहाय्याने चालत ती खिडकीपाशी गेली. धुक्याच्या चादरीला छिद्र पाडत सूर्याची किरणे धरणीला स्पर्श करण्यासाठी आतुर झाली होती. सूर्याच्या येण्याने खरंच वातावरण उत्साहीत झाले होते.तिची नजर समोरच्या रोपट्यावर गेली. कुठे पानांवर दवबिंदू उठून दिसत होते तर कुठे ते घरंगळून पडत होते.”माझे आयुष्य ही माझ्या हातून असेच निसटून जात आहे”,असे म्हणून ती उदास झाली.कॅन्सरने तिचे शरीरचं…

100 Words Stories

माया..

सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर श्रुती राहुलसोबत डिसेंबरमध्ये न्यूयॉर्कला शिफ्ट होणार होती. न्यूयॉर्कमध्ये डिसेंबर म्हणजे खुप थंडी, बर्फवृष्टी, ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागताची जंगी तयारी. श्रुती हे सर्व ऐकून होती. तिच्या आवडत्या व्यक्तीसोबत ती हे प्रत्यक्षात अनुभवणार होती म्हणून ती खुप आनंदात होती. राहुल आणि तिच्या सहजीवनला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार होती.दोन दिवसांनी श्रुती निघणार होती.बिनाआईच्या श्रुतीला…

100 Words Stories

हिवाळा.

हिवाळा म्हटला की हॉस्टेलची आठवण येणार नाही असे होत नाही. अहमदनगर मधील लोणी येथील मेडिकल कॉलेजला माझे एडमिशन झाले. त्यापूर्वी मुंबई बाहेर कधीही न गेलेली मी सरळ साडेचार वर्षासाठी तिथे राहिले. तिथे तापमानाचा पारा अगदी ४/५° एवढा खाली घसरायचा. एवढ्या थंडीची मला सवयच नव्हती.नेमके याच दिवसात परीक्षा असायची. परीक्षा म्हटली की रात्री जागून आणि सकाळी…

Stories

खंबीर सासू

लतिका आणि विराजस यांनी पळून जाऊन लग्न केले. लतिका अवघी वीस वर्षाची तर विरजस पंचवीसचा. लतिका अती श्रीमंत घरातून होती तर विरजस मध्यम वर्गीय. लतिक्याच्या घरच्यांचा या प्रेमाला तीव्र विरोध होता. तिच्या बाबांना तिच्यासाठी गर्भ श्रीमंत मुलगाच हवा होता. आणि असे ही तिच्या बाबांच्या मते हे तिच्या लग्नाचे वय नव्हते. अजून थोडी समज आल्यावर ती…

Quotes

तुळस.

तुळस म्हणजे पूजनीय आणि पवित्र अशी गुणकारी औषधी वनस्पती.मांगल्याचे प्रतीक म्हणून आहे तिची ख्याती.‘क्विन ऑफ हर्ब्स’ म्हणून आहे तिची महती.सकारात्मक उर्जेचा स्त्रोत म्हणून दारोदारी लावली जाते ही वनस्पती. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

100 Words Stories

संविधान दिवस.

आज संविधान दिवस. आजच्या दिवशी भारतीय लोकांनी भारताचे संविधान स्वीकारले. या देशाची राज्यघटना लोकशाहीचा पाया आहे. या देशाची संस्कृती, परंपरा, वारसा, मूल्य, विचार जपण्याचे आणि आयुष्याचे तत्वज्ञान सांगण्याचे कार्य राज्यघटनेने केले आणि करत आहे.फक्त उद्देश मोठा व चांगला असणे पुरेसे नाही, तर त्यास चांगल्या कृतीची जोड़ असेल तरच उद्देश परिपूर्ण होऊ शकतो.कोणी दुसरी व्यक्ती येऊन…

100 Words Stories

कृपया बंद करा..

अंधश्रद्धा मीराला बरेच वर्ष झाले मुलं होत नव्हतं. सर्व उपचार करून ती हताश झाली होती. एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून ती एका बाबाकडे गेली. तिला लवकरच मुलं होईल हे आश्वासन त्याने दिले. तो म्हणेल ते सर्व ती करू लागली. त्याला हव्या त्या सर्व गोष्टी ती पुरवू लागली. एकदा अचानक तिच्या कानावर बातमी आली. तो भोंदू बाबा लोकांना…

Stories

थोडंसं फिल्मी

१) काहीपे पोहोचने के लिये कहिसे निकलाना जरुरी है.. वीस वर्षांच्या नेहाचा प्रेमभंग झाला होता.बरेच महिने होऊन ती या दुःखातून बाहेर येत नव्हती.ती जुन्या आठवणी,वस्तू हृदयाशी कवटाळून बसली होती.तिची ही अवस्था पाहून,नाईलाजाने तिच्या आई बाबांनी तिच्याशी बोलायचे ठरवले.आईने तिला समजावले.तेव्हा ती आईला म्हणाली,’आई मी खूप प्रयत्न करते आहे पण मला यातून बाहेर येताच येत नाही’,…

Stories

रेमंड.. द कंप्लीट मॅन..

श्रावणी आणि श्रीधरचे लग्न आता दोन महिन्यांवर येऊन ठेपले होते. श्रावणी २७ वर्षांची तर श्रीधर ३० चा. दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर. मनमिळावू, मितभाषी, राजबिंडा श्रीधर तर थोडीशी लाजाळू,स्वच्छंदी, हसतमुख श्रावणी. दोघांच्याही आया बालपणीच्या मैत्रीणी. सारच काही तस जुळून ही आलं अन् योग्य ही वाटलं म्हणून या दोघांचं लग्न ठरलं. हे टीपिकल अरेंज मॅरेज नव्हते. पण श्रावणी…

Quotes

उमेद

असंख्य संकटे येऊनही जो परिस्थिती पुढे हतबल न होता यशाची उमेद सोडत नाहीत आणि प्रयत्नशील राहतो तोच नेहमी यशस्वी होतो. ***************************************************************************************************************************** आशावादी माणूस त्याच्या संघर्षातून यशाची उमेद निर्माण करतो. ***************************************************************************************************************************** आठवणी कधी सुखद असतात तर कधी दुःखद. दुःखद आठवणी ह्या नेहमी बोचतात पण काळाच्या ओघात भरून निघतात. तर सुखद आठवणी नेहमीच ताजातवान करतात आणि जगण्याची…