Poem

पणती.

एक पणती ज्ञानाची लावू.एक पणती समानतेची लावू.एक पणती समाधानाची लावू.एक पणती निसर्गाच्या रक्षणाची लावू.एक पणती साक्षरतेची लावू.एक पणती प्रेमाची लावू.एक पणती माणुसकीची लावू.चला खऱ्या अर्थाने ही दिवाळी तेजोमय बनवू. ©️®️डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

Quotes

पणती.

एका छोट्याश्या पणतीचा प्रकाश सुध्दा अंधारात आधार देतो, तसेच सकारात्मक विचार नेहमी आशावादी राहण्यास मदत करतात. ©️®️ डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

100 Words Stories

फराळ.

दिवाळी जवळ आली की सर्व गृहिणींची धावपळ सुरू होते. साफसफाई,रोषणाई,खरेदी या सोबतच गृहिणींना नेहमी चिंता लागलेली असते ती फराळाची.लाडू, करंजी, अनारसे, चकली, शंकरपाळी,शेव अशा कितीतरी पदार्थांची रेलचेल सुरू होते. फराळ बनवताना येणारी मज्जा सुध्दा निराळीच.या दिवसात घरातली मंडळी वेळात वेळ काढून एकत्र जमतात. गप्पा रंगतात. जुन्या नवीन गोष्टींचे आदान प्रदान होते. कदाचित जुन्या नवीन पिढीची…

Poem

सण आला दिवाळीचा.

सण आला दिवाळीचा,आनंद, चैतन्य आणि रोषणाईचा. सण आहे हा वात्सल्याचा, धन्वंतरीच्या आराधनेचा, लक्ष्मीच्या पूजनाचा.बहीण भावा मधल्या जिव्हाळ्याचा,पती पत्नी मधल्या प्रेमाचा. उत्सव आहे हा नात्यांचा. सध्याचा काळ आहे थोड खबरदारीने आणि जबाबदारीने वागण्याचा. स्वतः ची आणि स्वकियांची काळजी घेण्याचा. यंदाही जल्लोषात साजरा करू हा सण दिवाळीचा. पण अवलंब करू नवीन पद्धतींचा. सण साजरा करताना पाळू नियम…

Blogs

प्रेग्नंसी ते डिलिव्हरी – माझा अनुभव

(मी लिहिलेल्या सिझेरियन भाग १ आणि २ ह्या दोन्ही लेखांना उत्तम प्रतिसाद मिळाला. बऱ्याच वाचकांनी मला अजून वेगवेगळे विषय सुध्दा सुचविले. बऱ्याच जणींनी मला माझा अनुभव सुध्दा विचाराला. त्यामुळे हा लेख मी लिहायचे ठरवले.) माझ्या प्रेग्नंसीची सुरुवातच मळमळ,उलट्या आणि घेरी येण्याने झाली. तीन दिवस सतत मला मळमळल्या सारखे होत होते. थोडा तोल जात होता. कदाचित…

100 Words Stories

कोरोना मुळे जीवनाचे बदललेले रंग

स्वावलंबन – १ नंदिनी तिच्या तीन महिन्याच्या बाळाला घेऊन नुकतीच आईच्या घरून तिच्या घरी बँगलोरला आली होती.आणि आठवड्या भरातच लाॅकडाउन झाले.नंदिनी घाबरून गेली.बाळाच्या मालिश वाल्याबाई पासून ते अगदी घरकामाला येणाऱ्या बाईपर्यंत आता कोणीच येणार नव्हते. त्यात घरात हे दोघच.मला हे जमणार नाही,असे म्हणून नंदिनी रडूच लागली.नवऱ्याने तिला समजावले,आता आपल्याला जमवावचं लागेल. दुसऱ्या दिवसापासून ते कामाला…

Quotes

ऊन.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सुख दुःखाचे क्षण हे अगदी ऊन आणि सावली सारखे असतात. जसं ऊन सरून सावली येतेच तसेच दुःख संपून सुख हे येतच, हा विचार मनात ठेऊन आपण नेहमी प्रयत्नशील, आणि आशावादी राहावे. डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.

Poem

नवरा.

लग्न झाले आणि नवरा नावाचे पात्र आले माझ्या आयुष्यात,त्यांच्या येण्याने जाणवले, नक्की कसली उणीव होती माझ्या या प्रवासात. मी स्वच्छंदी, तो अगदी जबाबदरीने वागणारा.मी थोडी चिडकी, तो सर्व परिस्थिती शांतपणे हाताळणारा.मी थोडी अस्ताव्यस्त, तो अगदी नीटनेटकेपणे जगणारा.मी थोडीशी वेंधळी ,तो जपून पावलं टाकणारा.कधी मला हसवणारा, कधी माझ्या सोबत हसणारा.कधी मला समजवणारा, तर कधी वादविवाद करणारा.मी…

100 Words Stories

दहा बाय दहाची खोली.

रमाकाकुंनी त्यांच्या चाळीतल्या घराचे दुरुस्तीचे काम सुरू केले होते त्यामुळे त्यांची धावपळ होत होती. ते पाहून त्यांचा मुलगा सुमेध त्यांना म्हणाला,” आई इथे अगदी एशो आराम असतानाही तुझा जीव मात्र त्या दहा बाय दहाच्या खोलीत गुंतला आहे.विकून टाक आता ते घर.”ते ऐकून काकूंच्या डोळ्यांत लगेच अश्रु तरळले. त्या सुमेधला म्हणाल्या ,” तुझ्यासाठी ती दहा बाय…

Stories

खरच मी अपवित्र आहे का..? भाग २

क्रमशः अमोलने स्वतः ला सावरलं आणि म्हणाला, “मला नीट काय ते सांग.” सुरुची सांगू लागली,” मी बारा वर्षांची होते. एकदा खाली खेळत असताना शेजारी राहणारा एक दादा मला बोलवायला आला.. बाबांचा अपघात झाला आहे म्हणून आई तडक हॉस्पिटलमध्ये निघून गेली आहे आणि तिने मला तिथे बोलावलं आहे असा निरोप त्याने मला दिला.. तो मला तिथे…