she
100 Words Stories

तिचं वेगळेपण

ती इतर मुलींपेक्षा वेगळी होती.नटण्या मुरडण्यात तिला अजिबात रस नव्हता.तिचं वेगळेपण तिला जाणवतं होतं पण याचा नक्की अर्थ काय हेच तिला कळत नव्हतं.वय वाढलं तेव्हा गोष्टी उमजू लागल्या.चुकीच्या शरीरात ती बंदिस्त झाली होती.पण कोणाला सांगायची सोय नव्हती.आई बाबांनासुध्दा कळत होतं सर्व पण त्यांना वळवून घ्यायचं नव्हत काहीच.कॉलेज मध्ये मुलं चिडवायची तिला.आत्मविश्वास असा नव्हताच तिच्यामध्ये.हे जग…

Poem

दसरा.. – आपल्यातला रावण कुठवर जगणार?

दरवर्षी माणूस पुतळा रुपी रावणाचे माणूस दहन करतो पण त्याच्या अंतरी असलेला रावण मात्र त्याच्यावर हसतो.अरे माणसा.. तुझ्यात लपला आहे रावण, त्याला कोण मारणार?रोज कानावर बातमी येते स्त्री भ्रूण हत्येची, अत्याचाराची, बलात्काराची… तिचे लचके कुठवर तोडणार..?हे असे कधी पर्यंत चालणार..?प्रत्येक युगात तिला द्यावी लागली आहे अग्नी परीक्षा.. हा समाज तिला चरित्र हिन कुठवर ठरवणार ..?हे…

Stories

परदेशातला भोंडला..

. सुलभा काकू अमेरिकेत येऊन पाच महिने झाले होते. रमेश काका गेल्यानंतर त्या त्यांच्या मुलाकडे, पियूषकडे अमेरिकेत राहायला आल्या होत्या. तसं काका जाऊन आता दीड वर्ष होतं आलं होतं. काकांचं निधन झाल्यावर दोन महिन्यातच पियूषने काकूंनी त्याच्या सोबत अमेरिकेत येऊन राहायला सांगितले होते. पण काकू तयार नव्हत्या. पियूष सुध्दा हट्टी होता. तो काकूंनी घेऊन गेल्याशिवाय…

Poem

अक्कण माती चिक्कण माती या गाण्यावर आधारित – भोंडल्याचीगाणी

अक्कण माती चिक्कण मातीमाझी सासूबाई सुरेख गं,त्यांचे गोडवे किती गाऊ गं. माझी नणंद बाई सुरेख गं,तिचे कौतुक किती करू गं. माझे सासरे बुवा सुरेख गं,त्यांची स्तुती किती करू गं. माझे नवरोजी सुरेख गं,इश्श.. त्यांचे माझ्यावर खूप खुप प्रेम, त्यांचे किस्से किती सांगू गं. माझे सासर आहे सुरेख गं,किती गोष्टी सांगू गं. माझे माहेर आहे सुरेख…

Poem

विजयादशमी..

रावणावर रामाचा विजय म्हणजे विजयादशमी, महिषासुरावर दुर्गेचा विजय म्हणजे विजयादशमी, असत्यावर सत्याचा विजय म्हणजे विजयादशमी, वाईट प्रवृत्तीवर चांगल्या विचारांचा विजय म्हणजे विजयादशमी, नवीन गोष्टींचा आरंभ म्हणजे विजयादशमी, पाप ,क्रोध, लोभ, मोह, मस्तर, मद,अहंकार, आळस, हिंसा, चोरी यांचा त्याग म्हणजे विजयादशमी. सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्या. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Stories

स्पर्धा

स्पर्धानलिनी सकाळी वैतागतच उठली. तिची आज ऑफिसला जायची अजिबात इच्छा नव्हती.पण तरी सुद्धा ती उठून आवरू लागली. मयुरेशने हे पाहिले. तो तिला म्हणाला देखील खूपच कंटाळा आला असेल तर जाऊ नकोस. एक दिवस आराम कर. पण ती काही ऐकायला तयार नव्हती. मयुरेशने ही मग तिला जास्त फोर्स केला नाही. त्यालाही आज उठायला उशीरच झाला होता….

Poem

बाबा..

असतो एक बाबा मुलांवर खुप खुप प्रेम करणारा.मुलांचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी सतत झटणारा.त्याला ज्या ज्या सुखसोयी त्याच्या बालपणी मिळाल्या नाहीत त्या आपल्या मुलांना मिळाव्या म्हणून धडपडणारा.आईला असते चिंता रात्रीच्या जेवणाची,पण आयुष्य भराच्या शिदोरीची तरतूद आधीच करून ठेवणारा.वरून खूप कठोर पण आतून खूप कोमल असणारा.लेकामध्ये स्वतः चे बालपण शोधणारा.लेकीला तळ हाताच्या फोडासारखे जपणारा.स्वतः चा त्रास मुलांपासून…

100 Words Stories

स्मशान..

अरेरे..स्वतःची काय ही अवस्था करून ठेवली आहे माणसाने!!मरण असंही स्वस्त झालंच होत.पूर्वी निदान काही लोक तरी यायची अंत्ययात्रेला.मेलेल्या माणसाबद्दल चार चांगल्या गोष्टी बोलायचे,थोडी हळहळ व्यक्त करायचे,आता तेही बंद झालं आहे.इन मीन चार जण येतात आता अंत्यविधीसाठी. चला चार टाळकी येताना दिसताहेत..बघुया काय बोलत आहेत ते..अरे बापरे..ह्यांना तर काही सुख दुःखच नाही..डोळ्यात एक टिपूरपण नाही.काय म्हणताहेत…

Quotes

दुर्गा.

मंदिरात जाऊन दुर्गेची आराधना करण्याआधी घरातल्या, समाजातल्या तिच्या वेग वेगळ्या रुपांचा आदर केला तरी ती दुर्गा प्रसन्न होईल. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Poem

आदिशक्ती..

ती आहे पार्वती, ती दुर्गा सुध्दा आहे. एकीकडे ती सुंदरतेचे,चंचलतेचे, नाजुकतेचे प्रतीक आहे,. तर दुसरीकडे ती धाडसी, रणरागिणी सुध्दा आहे. ती वाटते नाजूक, पण तीच आदिशक्ती आहे. नवनिर्मितीचा अधिकार आहे तिला, कारण ते पेलवण्याच सामर्थ्य सुध्दा तिच्यामध्येच आहे. डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.