100 Words Stories

उमेद

राजीवला अर्धांवायूचा झटका आल्यामुळे त्याच्या शरीराची एक बाजू निष्क्रिय झाली होती.सुमती आणि इतर घरच्यांची त्याच्यामुळे होणारी धावपळ आणि त्रास त्याला पाहवत नव्हते.स्वतःचे कुठलेच काम एकट्याने करू शकत नव्हता,त्यामुळे तो हरून गेला होता,चिडचिडा झाला होता.योग्य उपचार केले तर राजीव पूर्ववत होऊ शकतो हे डॉक्टरने सुमतीला सांगितले.सुमतीचे राजीववर खुप प्रेम होतेच पण मुळ स्वभावसुध्दा जिद्दी होता.राजीवला बरे…

100 Words Stories

प्रयत्न

माझा दहा महिन्यांचा चिमुकला, गेले कित्येक दिवस स्वतंत्रपणे चालण्याचा प्रयत्न करत होता. पहिल्यांदा जेव्हा त्याने प्रयत्न केला तेव्हा तो पटकन खाली पडला. त्याला रडू आले. मी त्याला जवळ घेऊन कुरवाळले. तो शांत झाल्यावर पुन्हा त्याला उभे केले. एव्हाना त्याचा विश्वास बसला होता त्याची आई त्याच्या जवळ आहे .ती त्याला काही होऊ देणार नाही. त्याने पुन्हा…

100 Words Stories

स्वावलंबन

साताऱ्याहून राधिका समरशी लग्न करून मुंबईला आली. तिच्यासाठी हे सगळंच नवीन होत. घरचं तिच जग बनलं होत. सर्वच गोष्टींसाठी ती समरवर अवलंबून असायची.कंपनीच्या कामानिमित्त समरला सहा महिन्यांसाठी दुबईला जावं लागणार होत. राधिका हवालदिल झाली होती. आपण सर्व सांभाळू शकू का हा आत्मविश्वास तिच्यात नव्हता. माहेरी जायचा पर्याय होता पण कधी ना कधी आपल्यालाच आपल बघावं…

100 Words Stories

जीवन

रेखाचा नुकताच घटस्फोट झाला होता. तिच्या नवऱ्याला तिच्यासोबत राहायचे नव्हते. ती कशी अयोग्य जोडीदार आहे हे त्याने तिला वारंवार सांगितले होते. त्याच्या सततच्या सांगण्याने तिलाही आता ती कुठल्याच गोष्टीसाठी योग्य नाही असेच वाटू लागले होते. रेखाचे अवसानाच गळून गेले होते. तिचा आत्मविश्वास हरवला होता. तिची ही अवस्था तिच्या बाबांना बघवत नव्हती. एकेदिवशी त्यांनी तिच्या हातात…

100 Words Stories

माणुसकी..

२६ जुलै२००५ आजही त्या दिवसाच्या आठवणी ताज्या आहेत.मी तेव्हा पंधरा वर्षांची होते.माझ्या आयुष्यात मी पाहिलेली पहिली पूरपरिस्थिती.आभाळ फटल्यासारखा पाऊस कोसळत होता. मुंबापुरीची तुंबापुरी झाली होती.पहिल्यांदाच मुंबई थांबली होती. लोक जागोजागी अडकून पडले होते.प्रत्येकाला घर गाठायचे होते, पण बऱ्याच जणांना त्या रात्री ते शक्य झाले नाही.माणुसकी म्हणजे नक्की काय हे तो पर्यंत मूल्यशिक्षणात शिकले होते पण…

100 Words Stories

अनोळखी.. जुन्या प्रेमाची नवीन सुरुवात

तिने आज सात दिवसांनंतर डोळे उघडले होते. तो समोरच होता तिच्या. पण तो अनोळखी असल्यासारखी ती त्याला बघत होती. तो तिच्या जवळ गेला आणि तिने ओरडायला सुरुवात केली. त्याला काही कळायच्या आत डॉक्टर तिथे आले आणि त्यांनी त्याला बाहेर जायला सांगितले.डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी त्याला सांगितले, तिचा स्मृतीभ्रंश झाला आहे. हे ऐकुन त्याच्या पायाखालची…

100 Words Stories

नवीन सुरूवात..

प्रियाच्या आईला आता प्रियाच्या लग्नाचे वेध लागले होते. पण प्रियाला आईच्या लग्नाचा घाट घालायचा होता,पण तिच्या आईला हे मान्य नव्हते. प्रिया लहान असताना तिचे आई बाबा वेगळे झाले.पूर्वी अधेमध्ये बाबा यायचे भेटायला पण नंतर तेही येईनासे झाले. त्यांनी दुसर लग्न केलं आणि ते स्वतःच्या आयुष्यात रमले. पण आई मात्र प्रियाचे भविष्य उज्ज्वल बनविण्यात गुंतली होती….

100 Words Stories

क्षितिज

क्षितिज म्हणजे फक्त एक भास,आकाश आणि जमिनीच्या भेटीचा तो असतो केवळ एक आभास. ***************************************************************************************************************************** आकाशात रंगांची उधळण करीत अस्ताला जाणारा सूर्य नेहमीच मनाला भावतो.क्षितिजावर त्याला रोखून ठेवावे इतका तो सुरेख वाटतो.आयुष्यातल्या सुंदर आनंदी क्षणांचेही असेच असते,खुप रोखावेसे वाटते त्यांना, पण आपल्या हाती काहीच नसते.

100 Words Stories

आयुष्यातले छोटे हसरे क्षण..

समीर आणि नेहाचे भांडण झाले. नेहा माहेरी गेली. नेहा रुसल्यावर तिची नेहमी समजूत काढणारा समीर आज रागावला होता. त्यामुळे त्यानेही या वेळी फोन न करण्याचा निर्णय घेतला. तिथे नेहा समीरच्या फोनची वाट पाहत होती. नेहाला अस्वस्थ वाटत होते म्हणून ती डॉक्टरकडे गेली. तिथे गेल्यावर कळले ती आई होणार आहे. तिने तडक घरी जायचे ठरविले.समीर घरी…

100 Words Stories

प्रसंगावधान.. शो मस्ट गो ऑन

गेल्या काही दिवसात कोरोनामुळे बरीच संकटं आली. त्यातलच एक म्हणजे बेरोजगारी.अनंत असाच एक मध्यवर्गीय कुटुंबातील तरुण. सिव्हिल इजिनिअर. बाबांनंतर आईनेच सर्व सांभाळलं होत. कॉस्ट कटिंगमुळे अचानक त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. हे कळल्यावर त्याचं जगच काही क्षणासाठी थांबलं. एज्युकेशन लोन कसे भरणार,घरच्या गरजा कश्या पूर्ण करणार,त्यातच लहान बहिणीच मेडिकलच दुसर वर्ष होतं. तिचीही फी भरण…