Stories

तिचे सौंदर्य.. – भाग २

क्रमशः तिने डोळे उघडले तेव्हा ती हॉस्पिटल मध्ये होती. असंख्य वेदना होत होत्या तिला.गुडघ्या पासून ते पोटा पर्यंतचा भाग, उजवा हात , तसेच चेहेऱ्याच्या उजव्या बाजूचा थोडा फार भाग भाजला होता. शेजाऱ्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये आणले होते हे तिला डॉक्टर्स काढून कळले. सध्या घरातल्या कोणालाच भेटायची परवानगी नव्हती. तिने सर्वात आधी विचारले,’ माझा नवरा कुठे आहे?’…

Stories

तिचे सौंदर्य.. भाग १

गोष्ट १९९० ची आहे. नरेश आज लग्नासाठी स्थळं पाहायला जाणार होता. अनुराधा नावं होते मुलीचे. तिचा फोटो पाहूनच तो वेडा झाला होता. ‘ही फोट मध्ये दिसते तशीच असेल तर लगेच लग्न करेन’, हे त्याने मनाशी पक्के केले होते. इथे अनुराधाच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताची तयारी सुरू होती. नरेश कढून अनुराधाला होकार मिळावा यासाठी तिच्या आईने…

Stories

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा.. – भाग २

(सत्य घटनेवर आधारीत) दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर स्मिताने राजेशच्या हातात काही पैसे दिले. दोन लाख रुपये होते ते. ते राजेशला देत स्मिता म्हणाली, “एवढ्या वर्षात मी साठवलेली रक्कम आहे ही. तुम्ही जे घर खर्चासाठी मला पैसे द्यायचात त्यातून मी थोडे थोडे बाजूला काढायचे. अडी अडचणीच्या वेळी त्याचा उपयोग होईल म्हणून. आपण काहीतरी उद्योग सुरू करू….

Stories

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा..- भाग १

(सत्य घटनेवर आधारीत) स्मिता लग्न होऊन खेडेगावातून मुंबईला आली. घरच्या परिस्थितीमुळे तीच शिक्षण दहावी पर्यंतच झालं होतं. तिचा नवरा राजेश बारावी शिकलेला. स्मिता आणि राजेश खुप समजूतदार होते. त्या दोघांच्याही त्यांच्या जोडीदाराकडून अवाजवी अपेक्षा नव्हत्या. एकमेकांना समजून घेऊन आदराने आयुष्य व्यतीत करावे एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. राजेश एका ट्रॅव्हल कंपनी मध्ये नोकरी करत होता….

Stories

त्या दोघी – भाग २

क्रमशः दुसरा दिवस उजाडला. अनघा काकू आज लवकरच उठल्या होत्या. सर्वांचा नाश्ता आणि रोहित आणि मीराच्या डब्ब्यांची तयारी सुद्धा त्यांनी करून ठेवली होती. मीरा तिच्या नेहमीच्या वेळेत स्वयंपाक घरात आली. पाहते तर सासू आधीच हजर. आता पुन्हा काहीतरी ऐकव लागणार असे तिला वाटले. दिवसाची सुरुवातच खराब होणार असे ती मनोमन पुटपुटली. पण झाले उलट. काकू…

Stories

त्या दोघी – भाग १

( या कथेत सासू सुनेच्या नात्याची एक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.) हल्ली अनघा काकू थोड्या चिंतेतच असायच्या. त्याच्या लाडक्या लेकाच, रोहितचं लग्न होत.जस जशी लग्नाची तारीख जवळ येत होती तस तशी त्यांची चिंता वाढतच चालली होती. त्यांची होणारी सून, मीरा त्यांच्या परिचयाची होती. रोहितचं हे अरेंज कम लव्ह मॅरेज होतं. मीरा इंटेरियर डिझाईनर होती….

Stories

शिकवणारा क्षण

स्वरा हल्ली सतत कुठल्यातरी विचारात हरवलेली असायची. नुकतीच तिची अकरावी ची परीक्षा होऊन कॉलेज ला सुट्टी सुरू झाली होती. पण स्वरा ने जरा ही वेळ न दवडता बारावी आणि वैद्यकीय अभ्यासाच्या प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली होती. स्वरा म्हणजे विजय आणि रश्मी यांची लेक. विजय एका बँकेत नोकरी करत होता तर रश्मी छोट्याश्या प्रायव्हेट कंपनी…

Stories

.. बाबा होते म्हणून.

बघता बघता तो दिवस आला ज्याची सर्वच आतुरतेने वाट पाहत होते. राधाच लग्न. उद्या राधाच लग्न होत. आज संध्याकाळी तिला हळद लागणार होती. घरात चोहीकडे आनंदाचे वातावरण होते. सर्वांचीच धावपळ सुरू होती. राधा मात्र तिच्या खोलीत शांत बसून होती. कालपर्यंत सार काही मनासारखं होत आहे,आता आपलं सहजीवन सुरू होणार आहे म्हणून अगदी आपल्याच धुंदीत वावरणारी…

Stories

थँक्यू कोरोना – एका आईचे पत्र.

कोरोना कोरोना.. सध्या बघावं तिथे, ऐकावं तिथे फक्त तुझाच बोभाटा आहे. तशी तुझी आणि माझीओळख नाही आहे. आपण आतापर्यंत कधीच संपर्कात आलो नाही. खरतर आपली ओळख नसेलीच बरी. आपण कधीही एकमेकांच्या संपर्कात येऊ नये हे अगदी मनापासून वाटते मला. देव करो आणि तसेच झाले पाहिजे. पत्राच्या सुरुवातीला प्रिय, आदरणीय वैगरे वैगरे लिहिण्याची पद्धत आहे. पण…

Stories

जोडीदार

त्याने घड्याळाकडे पाहिले आणि तो नेहमी प्रमाणे वैतागत तो बेडरूम मध्ये गेला. ती नेहमी प्रमाणे आरशासमोर उभी राहून तयार होत होती. तिला बघताच तिच्या वर हसावं की तिला ओरडाव हेच त्याला कळतं नव्हते.