डॉक्टर साठेंची तृप्ती अभ्यासात साधारण होती, पण ती एक उत्तम नर्तिका होती. घरात सर्वच डॉक्टर्स, त्यामुळे तिनेही डॉक्टरच बनायचे हे साठे कुटुंबीयांचे आधीच ठरलेले. घरच्यांच्या आनंदासाठी तिने बारावी सायन्स केलेही. मेडिकलला एडमिशन घेण्याइतके मार्क्स नसतानाही डोनेशन भरून ऍडमिशन घेण्याची साठेंची तयारी झाली.
तुप्तीला आता हे चुकीचे वाटू लागेल. तिने घरच्यांना सांगितले मला डॉक्टर व्हायचे नाही. मला भरतनाट्यम मध्येच करिअर करायचे आहे.घरातून तीव्र विरोध झाला. पण तृप्ती ठाम होती. तिच्या आजीआजोबानी तिला साथ दिली. मनाविरुद्ध करिअर निवडणे अयोग्य आहे.अशाने ती चांगली डॉक्टर बनुच शकणार नाही हे त्यांनी इतर सदस्यांना पटवून दिले. तिला हवे ते करीअर निवडायची मुभा मिळाली.
सतत करिअर निवडीच्या प्रश्नांमुळे दडपणात असणारी तृप्ती आज मनसोक्त नाचली.आज पहिल्यांदा तिला मोकळे झाल्यासारखे वाटले.
डॉ. अश्विनी अल्पेश नाईक.


