Home » Marathi » 100 Words Stories » हिवाळा.

हिवाळा.

हिवाळा म्हटला की हॉस्टेलची आठवण येणार नाही असे होत नाही. अहमदनगर मधील लोणी येथील मेडिकल कॉलेजला माझे एडमिशन झाले. त्यापूर्वी मुंबई बाहेर कधीही न गेलेली मी सरळ साडेचार वर्षासाठी तिथे राहिले. तिथे तापमानाचा पारा अगदी ४/५° एवढा खाली घसरायचा. एवढ्या थंडीची मला सवयच नव्हती.नेमके याच दिवसात परीक्षा असायची. परीक्षा म्हटली की रात्री जागून आणि सकाळी लवकर उठून अभ्यास करणं आलंच. त्यात तिथे अंघोळीच्या पाण्यासाठी सोलरपॅनल. त्या दिवसात बरेच दिवस सूर्यदेवाचे दर्शनच व्हायचे नाही. मग आमची अंघोळीच्या गरम पाण्यासाठी धडपड सुरू व्हायची.नकोसे व्हायचे ते दिवस.
सर्व सोडून मऊ बिछान्यात उबदार चादरीत मस्त झोपावसं वाटायचं.पण तस कधीच करता आले नाही. कालांतराने कधी त्या बोचऱ्या थंडीची सवय झाली कळलेच नाही.

डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *