रेखाचा नुकताच घटस्फोट झाला होता. तिच्या नवऱ्याला तिच्यासोबत राहायचे नव्हते. ती कशी अयोग्य जोडीदार आहे हे त्याने तिला वारंवार सांगितले होते. त्याच्या सततच्या सांगण्याने तिलाही आता ती कुठल्याच गोष्टीसाठी योग्य नाही असेच वाटू लागले होते. रेखाचे अवसानाच गळून गेले होते. तिचा आत्मविश्वास हरवला होता. तिची ही अवस्था तिच्या बाबांना बघवत नव्हती. एकेदिवशी त्यांनी तिच्या हातात एक पाच रुपयाचे नाणे दिले आणि तिला विचारले याच्या बाजू किती? ती म्हणाली दोन. बाबा म्हणाले जीवनातल्या बऱ्याच गोष्टी या अशाच असतात. जे झालं ते वाईट झालं.तुझ्या नवऱ्याला जे वाटतं तो त्याचा दृष्टकोन आहे. त्यात तुझी काही चूक नाही. मग चूक नसतानाही स्वतःला का शिक्षा देतेस. बाबांना नक्की काय म्हणायचे आहे ते रेखाला समजले होते.
डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.


