क्षितिज म्हणजे फक्त एक भास,
आकाश आणि जमिनीच्या भेटीचा तो असतो केवळ एक आभास.
*****************************************************************************************************************************
आकाशात रंगांची उधळण करीत अस्ताला जाणारा सूर्य नेहमीच मनाला भावतो.
क्षितिजावर त्याला रोखून ठेवावे इतका तो सुरेख वाटतो.
आयुष्यातल्या सुंदर आनंदी क्षणांचेही असेच असते,
खुप रोखावेसे वाटते त्यांना, पण आपल्या हाती काहीच नसते.


